• Download App
    शेतकरी आंदोलनाविषयी गुप्तचर यंत्रणा सतर्क, पाकिस्तानी ISI करू शकते हिंसा भडकवण्याचा प्रयत्न । Intelligence agencies alert about farmers Protest in Delhi, Pakistani ISI may conspire to incite violence

    शेतकरी आंदोलनाविषयी गुप्तचर यंत्रणा सतर्क, पाकिस्तानी ISI करू शकते हिंसा भडकवण्याचा प्रयत्न

    farmers Protest in Delhi : कृषी कायद्याचा निषेध करणार्‍या शेतकरी आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. ते पाहता आज शेतक्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलीस तसेच इतर एजन्सींना सतर्क करण्यात आले आहे. पाकिस्तानी आयएसआयशी संबंधित लोक शेतकरी आंदोलनाला लक्ष्य करू शकतात. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ही शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन कट रचत असल्याबाबत गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलीस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) सतर्क केले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, आयएसआय शेतकऱ्यांना भडकवून हिंसाचार पसरविण्याचा प्रयत्न करू शकते. Intelligence agencies alert about farmers Protest in Delhi, Pakistani ISI may conspire to incite violence


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कृषी कायद्याचा निषेध करणार्‍या शेतकरी आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. ते पाहता आज शेतक्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलीस तसेच इतर एजन्सींना सतर्क करण्यात आले आहे. पाकिस्तानी आयएसआयशी संबंधित लोक शेतकरी आंदोलनाला लक्ष्य करू शकतात. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ही शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन कट रचत असल्याबाबत गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलीस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) सतर्क केले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, आयएसआय शेतकऱ्यांना भडकवून हिंसाचार पसरविण्याचा प्रयत्न करू शकते.

    आज 26 जून रोजी शेतकर्‍यांचे मोठे आंदोलन आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस आणि अन्य संबंधित एजन्सींना या संदर्भातील एक पत्र पाठविण्यात आले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी काही मेट्रो स्टेशनसुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव काही तासांसाठी बंद करण्यात आले होते. मेट्रो स्थानकांच्या बाहेर समर्पित व पुरेशी सुरक्षा तैनात केली जाईल, असे या पत्रात नमूद केले आहे.

    खबरदारीचा उपाय म्हणून आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये म्हणून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत विद्यापीठ, सिव्हिल लाईन्स आणि विधानसभा अशी तीन मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली पोलिसांच्या सल्ल्यानुसार हे पाऊल उचलले गेले आहे, त्यांनी व्यापक सुरक्षा व्यवस्थादेखील केली आहे.

    दिल्लीच्या सीमावर्ती भागात आज अनेक शेतकरी गट निषेध करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये सामील होतील, अशीही अपेक्षा आहे.

    दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी शेतकरी संघटनांनी केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधातील आपले आंदोलन संपवावे, असे आवाहन केले आहे. त्यांच्याशी सरकारच्या चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या. कृषी सुधारणा विधेयक शेतकर्‍यांच्या जीवनात सुधारणा आणेल, असा केंद्राचा विश्वास आहे. मात्र, पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांतील शेतकरी संघटनांनी या कायद्यांना विरोध केला आहे.

    Intelligence agencies alert about farmers Protest in Delhi, Pakistani ISI may conspire to incite violence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य