• Download App
    त्या तिघी गेल्या कोरोनाची लश घ्यायला, त्यांना टोचली कोरोनाऐवजी रेबीजची लस, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना|Insted of corona vaccine docter gave rebbis dose

    त्या तिघी गेल्या कोरोनाची लस घ्यायला, त्यांना टोचली कोरोनाऐवजी रेबीजची लस, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

    विशेष प्रतिनिधी 

    मुझफ्फरनगर : डॉक्टराचे जर कामात लक्ष नसेल तर काय होते याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला. उत्तर प्रदेशच्या श्याकमली जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात तीन महिलांना कोरोना लशीऐवजी रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली,Insted of corona vaccine docter gave rebbis dose

    अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी दिली. येथील तीन महिला गुरुवारी (ता. ८) कंधाला येथील सरकारी आरोग्य केंद्रात कोरोनाची लस घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र लशीचा डोस दिल्यानंतर त्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची पावती देण्यात आली.



    कुटुंबातील सदस्यांनी घटनेचा तीव्र निषेध करत, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी योग्य चौकशी केली जाईल, असे आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे सर्वत्र संतापाचे त्याचप्रमाणे काळजीचे वातावरण पसरले आहे.

    नागरिक आधिच कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत. अशा वेळी अशा प्रकारे वागणूक मिळू लागली तर लोकांचे जीवन आणखी धोक्यात घातल्यासारखे होणार आहे.

    Insted of corona vaccine docter gave rebbis dose

    हे ही वाचा

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!