• Download App
    गॅस सिलिंडर नको त्याऐवजी चूल द्या!, उत्तर प्रदेशातील आमदाराची अजब मागणी|Instead of not wanting a gas cylinder, give a chool !, a strange demand from an MLA from Uttar Pradesh

    गॅस सिलिंडर नको त्याऐवजी चूल द्या!, उत्तर प्रदेशातील आमदाराची अजब मागणी

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – उत्तर प्रदेशातील काँग्रेस आमदाराने सरकारी निवासस्थानी गॅस शेगडीऐवजी चूल देण्याची विचित्र मागणी केली आहे. दीपक सिंह असे या आमदाराचे नाव असून, त्यांनी सरकारी निवासस्थानाच्या प्रभारींना यासंदर्भात चक्क लेखी पत्रच पाठविले आहे.Instead of not wanting a gas cylinder, give a chool !, a strange demand from an MLA from Uttar Pradesh

    पत्रात आमदार दीपक सिंह म्हणतात, २०२४ पूर्वी एलपीजीच्या दरवाढीतून दिलासा मिळण्याची कसलीही शक्यता नाही. दिवसेंदिवस गॅस सिलिंडर, कोळसा व लाकडाच्या तुलनेत महाग होत आहे. त्यामुळे, लखनौतील डालीबागमधील माझ्या सरकारी निवासस्थानी गॅस सिलिंडरऐवजी चूल देण्यात यावी. येथील बहुमजली इमारतीतील सर्व तीन सदनिकांमध्ये चुलीची सोय करावी.



    लखनौत सध्या १४.२ किलोच्या अनुदानित व विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ९०० रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल व एलपीजी सिलिंडरचे दर वाढत आहेत. काँग्रेसने यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. इंधनावरील कर कमी करून सामान्य नागरिकांवरील बोझा कमी करण्याची मागणीही पक्षाकडून केली जात आहे.

    सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९७५ रुपये असून महिन्यातून दोन सिलिंडरची गरज पडते. त्याचवेळी, चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी महिन्याला ५०० रुपये खर्च येतो. त्यामुळे, लखनौतील माझ्या सरकारी निवासस्थानी चुलीची सोय करावी. येथील अन्य आमदारांनाही गॅस सिलिंडरऐवजी चूल हवी आहे.

    Instead of not wanting a gas cylinder, give a chool !, a strange demand from an MLA from Uttar Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य