Rahul Gandhi post : इन्स्टाग्राम आणि फेसबुकने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पोस्ट काढून टाकली आहे. यात राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या पालकांची ओळख उघड केली होती. यापूर्वी इन्स्टाग्राम आणि फेसबुकने दिल्ली बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची ओळख जाहीर केल्याप्रकरणी त्यांना नोटीसही बजावली होती. Instagram and Facebook removed Rahul Gandhi post, shared a picture of Delhi rape victim parents
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इन्स्टाग्राम आणि फेसबुकने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पोस्ट काढून टाकली आहे. यात राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या पालकांची ओळख उघड केली होती. यापूर्वी इन्स्टाग्राम आणि फेसबुकने दिल्ली बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची ओळख जाहीर केल्याप्रकरणी त्यांना नोटीसही बजावली होती.
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) कडून समन्स मिळाल्यानंतर एका आठवड्याने फेसबुकने मंगळवारी कारवाई केली आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना इन्स्टाग्रामवरील त्यांची पोस्ट काढून टाकण्यास सांगितले.
फेसबुकने दिले होते फोटो हटवण्याचे आदेश
एनसीपीसीआरने यापूर्वी फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधींविरोधात कारवाई करण्यास सांगितले होते. 13 ऑगस्ट रोजी एनसीपीसीआरने फेसबुकला समन्स जारी केले होते आणि त्यांच्या प्रतिनिधींना व्यक्तिशः उपस्थित राहण्यास सांगितले होते. प्रतिनिधींनी नोटिशीला प्रतिसाद दिला नाही. यानंतर कारवाई करत फेसबुकने राहुल गांधींना ईमेल केला आणि फोटो काढून टाकण्यास सांगितले. जेव्हा फेसबुकने राहुल गांधी यांना एनसीपीसीआरला मेलची प्रत पाठवली, तेव्हा बाल हक्क पॅनलने त्यांना समन्समधून सूट दिली.
4 ऑगस्ट रोजी एनसीपीसीआरने ट्विटरला याच प्रकरणात राहुल गांधींच्या खात्यावर कारवाई करण्यास सांगितले होते. यानंतर ट्विटरने त्यांचे खाते लॉक केले होते. शनिवारी त्यांचे खाते पुन्हा बहाल झाले. एनसीपीसीआरने म्हटले होते की, पीडितेच्या आई-वडिलांची ओळख उघड करणे हे बाल न्याय कायद्याच्या कलम 74, पॉक्सो कायद्याच्या कलम 23 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 228 ए चे उल्लंघन आहे.
Instagram and Facebook removed Rahul Gandhi post, shared a picture of Delhi rape victim parents
महत्त्वाच्या बातम्या
- Maria Andrejczyk : पोलंडच्या ऑलिम्पिक खेळाडूने रौप्य पदकाचा केला लिलाव, मिळालेल्या पैशांतून आजारी मुलांवर शस्त्रक्रिया
- Childrens Vaccine : जॉन्सनने भारतात चाचणीसाठी मागितली परवानगी, 12 ते 17 वर्षांच्या मुलांवर होणार परीक्षण
- पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवादाने श्रद्धा दडपली जाऊ शकत नाही, सोमनाथ मंदिर आमच्या श्रद्धेचे प्रेरणास्थान !
- तालिबानने कंधार आणि हेरातमधील भारतीय दूतावासात कुलूप तोडून केला प्रवेश, कार्यालयांची घेतली झडती
- Afghanistan Crisis : तालिबान्यांकडून पत्रकाराच्या शोधासाठी घरोघरी धाडी, कुटुंबीयांची केली निर्घृण हत्या