• Download App
    एमस्ची आयएनआय सीईटी पुढे ढकलण्याचे न्यायालयाच आदेश। INI CET postponed

    एम्स पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशपरीक्षा महिनाभर लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून (एम्स) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘आयएनआय सीईटी- २०२१’ साठी १६ जून ही तारीख निश्चि्त करणे हा मनमानीपणा असल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने आज ही परीक्षा एक महिन्यानंतर घेण्याचे निर्देश ‘एम्स’ला दिले आहेत. एम्सकडून ८१५ जागांवरील प्रवेशासाठी तब्बल ८० हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. INI CET postponed



    न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या.एम.आर.शहा यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. या संदर्भातील पूर्वीच्या तारखेला आव्हान देणारी याचिका काही डॉक्टरांनी सादर केली होती. उमेदवारांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आहेत. अनेक डॉक्टर हे कोरोनाच्या ड्युटीवर असल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर पोचणे अवघड होते, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

    INI CET postponed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : राहुल गांधींच्या मंचावरून PM मोदींना शिवीगाळ; भाजप नेत्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न