विशेष प्रतिनिधी
रायगड : महागाईने राज्यातील जनतेचे कंबरडे मोडले आहे. कोरोनात एकवेळच्या जेवणाची भ्रांत असताना आता गॅस सिलेंडरचे दर परवडत नाहीत, असा संताप रायगड येथील गरीब महिलांनी व्यक्त केला.
Inflation is high, gas is unaffordable, cooking on the stove is impossible ; women of Raigad got angry
गॅस दरवाढीमुळे उज्ज्वलाच्या लाभार्थ्याच्या हाती फुकणी आली आहे. ग्रामीण व शहरी भागात आता चुली पेटल्या आहेत. उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ९०० रुपये भरुन सिलेंडर आणणे अशक्य झाले आहे. ग्रामीण भागात पुन्हा चुलीवर स्वयंपाक बनविण्यास प्राधान्य दिले जात आहे.
उज्वला योजनेत गोरगरिबांना मोफत गॅस कनेक्शन दिले. त्यामुळे चुलीच्या धुराचा सामना करणाऱ्या महिलांना थोडा आधार मिळाला. पण गॅस कंपन्यांनी सिलेंडरच्या किंमती सतत वाढविल्या आहेत.
बेणसे सिद्धार्थ नगर येथील छायाबाई सावंत म्हणाल्या, गॅसचे भाव वाढल्याने घर चालवावे कसे ? असा प्रश्न पडला.
महिलांना लाकूड फाटा जमा करायला रानावनात भटकावे लागत आहे. धुराचा त्रास होतो, चुलीवर जेवण बनवणे कठीण जात आहे. महागाई वाढली आहे.पावसात लाकडे पेटत नाहीत आणि रॉकेल मिळत नाही.पावसाळ्यात रानात जाणे शक्य नाही, ओली लाकडे पेटत नाहीत. प्लास्टिकवर बंदी असून रेशनवर रॉकेल मिळत नाही, चहूबाजुनी कोंडी झाली आहे, असा संताप राबगाव येथील महिलांनी व्यक्त केला.
सुधागड तालुक्यात घरोघरी चुली पेटल्या आहेत. वृद्ध महिलांची चुलीवर जेवण बनविताना दमछाक होते. गॅससाठी १ हजार रुपये लागतात. म्हातारपणामुळे लाकड आणता येत नाहीत. सरकारने गरिबाला जगवावे ही विनंती, असे बेणसे सिद्धार्थनगर येथील चंद्रभागा अडसुळे यांनी सांगितले.
राबगाव येथील सरिता वातेरे म्हणाल्या, कोरोनात पैसे आणणार कुठून, महागाईने बेजार झालोय, चूल पेटवायची तर लाकड आणावी लागतात, जंगलात जावे लागते, पावसात जाणे शक्य नाही, रेशनवर रॉकेल देखील मिळत नाही , चूल पेटवावी तरी कशी ? असा प्रश्न पडतो.
Inflation is high, gas is unaffordable, cooking on the stove is impossible ; women of Raigad got angry
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना जावेद अख्तरना भोवली; दिल्ली-मुंबईत फौजदारी गुन्हे दाखल
- “शिवलीला ताई तुम्ही कीर्तनकार आहात तुमची समाजाला गरज आहे बिग बॉसला नाही” , समर्थक झाले नाराज
- महापालिका वॉर्ड – प्रभाग रचना; अख्ख्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला ना… मग मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील ही फट का ठेवली…??
- पंजाब काँग्रेसमध्ये आता कॅप्टनचेच बंड; म्हणाले- राहुल-प्रियांका अनुभवशून्य, त्यांची सल्लागारांकडूनच दिशाभूल, सिद्धूंविरुद्ध देणार मजबूत उमेदवार!