वृत्तसंस्था
कोलंबो : चिनी ड्रॅगनचा कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या श्रीलंकेत पराकोटीची आर्थिक कोंडी झाली आहे. कारण या ठिकाणी आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावर हिंसाचार करत आहेत. अखेर श्रीलंकेत सत्तांतर झाले आहे. त्यानंतर प्रचंड हिंसाचार झाला, त्यामध्ये एका खासदाराचा मृत्यू झाला आहे. चीनच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या श्रीलंकेला अधिक मदतीसाठी कर्ज देण्याची चीनने पुन्हा तयारी चालवली आहे. Inflation burns in Sri Lanka; Post-independence violence; Death of an MP
श्रीलंकेत झालेल्या हिंसाचारामुळे आणि प्रचंड महागाई वाढल्याने श्रीलंकेत अखेर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. एवढे होऊनही श्रीलंकेत हिंसाचार न थांबता तो अधिकच उसळला आहे. या हिंसाचारामध्ये आता सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीलंकेचा प्रवास यादवीकडे सुरू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमरकीर्ती अथूकोरला असे मृत्यू झालेल्या खासदाराचे नाव आहे.
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षेंनी काहीच वेळापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांचे समर्थक आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात हिंसाचारास सुरुवात झाली. या हिंसाचारामध्ये सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा मृत्यू झाला आहे, तसेच आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 139 जण जखमी झाले आहेत. श्रीलंकेतील अमेरिकेच्या राजदूतांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर सत्ताधारी पक्षाने हल्ला केल्याची घटना दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Inflation burns in Sri Lanka; Post-independence violence; Death of an MP
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाकाळात सर्वसामान्य गुंतवणूकदारांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले कौतुक
- राजद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर हा पुनर्विचाराचा आधार ठरत नाही, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
- पुतीन सरकारची दंडेली, युक्रेन युध्दाबाबत टीका केली म्हणून रशियातील पत्रकाराला एक लाख रुबल दंड