• Download App
    अरुणाचलच्या तवांगमध्ये मोठा संघर्ष; 300 चिनी सैनिकांची घुसखोरी भारतीय सैन्याने रोखली; भारतीयांपेक्षा अधिक चिनी सैनिक जखमी Infiltration of 300 Chinese soldiers was stopped by Indian army

    अरुणाचलच्या तवांगमध्ये मोठा संघर्ष; 300 चिनी सैनिकांची घुसखोरी भारतीय सैन्याने रोखली; भारतीयांपेक्षा अधिक चिनी सैनिक जखमी

    वृत्तसंस्था

    तवांग : अरुणाचल प्रदेशाच्या तवांगमध्ये डोकलाम आणि गलवान यांच्यासारखा संघर्ष करून घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी हाणून पाडला आहे. चिनी बाजूकडून तब्बल 300 सैनिक मोठ्या तयारीनिशी 9 डिसेंबर 2022 रोजी तवांग मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु भारतीय सैन्याने अचानक त्यांच्यावर प्रतिहल्ला करून चिनी सैनिकांची घुसखोरी रोखली. चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्याने करारा जबाब दिला. यामध्ये चिनी सैनिक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले असून काही भारतीय सैनिकही जखमी झाले आहेत. परंतु चिनी सैनिकांचे जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती भारतीय सैन्य दलाच्या सूत्रांनी दिली आहे. Infiltration of 300 Chinese soldiers was stopped by Indian army

    भारतीय सैन्य दलाने चिनी सैन्याची घुसखोरी रोखल्यानंतर दोन्ही बाजूचे सैन्य आपापल्या शिबिरांमध्ये परत गेले असून चिनी सैन्य मोठ्या तयारीनिशी घुसखोरीचा प्रयत्नात पुढे आले होते. परंतु, भारतीय सैनिकांची तयारी त्यांच्या लक्षात आली नव्हती. भारतीय सैन्य इतका कडवा प्रतिकार करेल अशी त्यांना अपेक्षा नव्हती. परंतु हा कडवा प्रतिकार होऊन बरेच चिनी सैनिक जखमी झाल्यानंतर चीनने माघार घेतली. चिनी सैन्याने माघार घेऊन ते आपल्या शिबिरात परत गेले.

    – डोकलाम मध्येही प्रयत्न

    भूतान सीमेजवळ डोकलाममध्ये चिनी सैन्याने असाच घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु भारतीय सैन्याने तो हाणून पाडला होता त्यानंतर लडाखच्या गलवान मध्ये चिनी सैन्य आणि भारतीय सैन्य यांच्यात हिंसक संघर्ष उसळला होता यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. परंतु, भारतीय जवानांनी प्रचंड प्रतिहल्ला चढवून 42 चिनी सैनिकांना ठार केले होते. याचा अधिकृत आकडा चिनी बाजूने कधीच सांगितला नाही. परंतु, गलवान संघर्षात चीनची मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाल्याचे त्या देशाने कबूल केले होते.

    आता अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये तब्बल 300 सैनिकांसह चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने तितक्याच प्रखरतेने चिनी सैन्याच्या घुसखोरीला रोखून प्रतिहल्ला केल्याने चिनी सैन्य माघारी परतले आहे. या संघर्षात काही भारतीय सैनिक जखमी झाले आहेत. पण त्यापेक्षा कितीतरी अधिक चिनी सैनिक जखमी झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

    Infiltration of 300 Chinese soldiers was stopped by Indian army

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार

    Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले

    Praggnanandhaa : प्रज्ञानंदाने वर्ल्ड नंबर-1 कार्लसनला 39 चालींमध्ये हरवले; लास वेगास स्पर्धेत अव्वल