नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कथित समर्थकांना समर्थकांवर तोफा डागताना स्वातंत्र्यवीर सावरकर, हृदयनाथ मंगेशकर, मजरूह सुलतानपुरी, प्रोफेसर धर्मपाल तसेच गायक संगीतकार किशोर कुमार या प्रख्यात व्यक्तींची उदाहरणे दिली. या सर्व व्यक्तींवर काँग्रेसच्या सरकारांनी कसा अन्याय केला याचे सविस्तर वर्णन केले.Indira Gandhi’s 20-point program was not supported
संगीतकार गायक किशोर कुमार यांच्यावर काँग्रेसने कसा अन्याय केला होता? याची कहाणी आणीबाणीनंतर आलेल्या जनता सरकारने नेमलेल्या शहा कमिशनच्या रिपोर्ट मधून दिसून येते. किशोर कुमार यांना 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वीस कलमी कार्यक्रमाला पाठिंबा देण्यास सांगण्यात आले होते.
१९७१ war : मोदी सरकार इंदिराजींचा उल्लेख करत नाही, कारण ते सत्याला घाबरते!!; राहुल गांधींचा हल्लाबोल
वीस कलमी कार्यक्रमासंदर्भात काही गीते लिहून घेऊन ती दूरदर्शन आणि आकाशवाणीवर सादर करण्याची ऑफर किशोर कुमार यांना त्यावेळचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव सी. बी. जैन यांनी दिली होती. परंतु तब्येतीचे कारण सांगून किशोर कुमार यांनी ही ऑफर नाकारली होती.
सी. बी. जैन यांनी आपल्या वरिष्ठ सचिवांना त्या संदर्भात माहिती दिली. हे प्रकरण त्यावेळचे माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांच्यापर्यंत पोहोचले. शुक्ला यांनी ताबडतोब किशोर कुमार यांच्या गाण्यांवर दूरदर्शन आणि आकाशवाणी वर बंदी घालायचे आदेश काढले. आणीबाणीच्या संपूर्ण कालावधीत किशोर कुमार यांची गाणी आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यावर सादर करण्यात आली नाहीत. शहा कमिशनच्या रिपोर्ट मध्ये याचा तपशीलवार खुलासा करण्यात आला आहे. हे कमिशन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारने नेमले होते.
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारने कशाप्रकारे अत्याचार केले याचे खुलासे शहा कमिशनच्या रिपोर्ट मध्ये आहेत.
Indira Gandhi’s 20-point program was not supported
महत्त्वाच्या बातम्या
- शिवाजी पार्कला स्मशानभूमी बनवू नका; प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट मत; लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद
- संपकरी एसटी कामगार विलीनीकरणासाठी आग्रही; कामगार गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी!!
- आमदार नितेश राणे वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल
- एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री ! ठाण्यात बॅनर झळकल्याने आश्चर्य; अक्षरे पुसून वाद मिटविण्याचा प्रयत्न