नाशिक : भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या शंभर कोटींच्या टप्प्याचे जागतिक पातळीवर सेलिब्रेशन झाले आहे. केवळ जागतिक आरोग्य संघटनेचे याची दखल घेतली असे नसून अमेरिका, इजरायल युरोपमधील अनेक देशांनी भारताचे, भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे विशेष अभिनंदन केले आहे.India’s Rs 100 crore vaccination shines in the world;
भारताचा लसीकरण मोहिमेचे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक घेब्रायासस यांनी केले आहे. इजरायलच्या पंतप्रधानांनी त्याची आवर्जून दखल घेतली आहे. त्याचबरोबर भारतातील अमेरिकेच्या दूतावासाने देखील भारतीयांच्या अभिनंदनाचे ट्विट केले आहे. याच्या बातम्या भारतीय प्रसार माध्यमांनी दाखविल्या आहेत. पण त्यांची दखल छोट्या स्वरूपातच घेतली आहे. त्यापेक्षा प्रसार माध्यमांनी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने “न टाकलेल्या” छाप्यांचा बभ्रा जास्त केला आहे.
एकीकडे जागतिक पातळीवर भारताच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेतली असताना भारतात मात्र प्रसार माध्यमांचे कॅमेरे, बुम्स आणि प्रतिनिधी यांची धाव म्हणत मन्नत, आर्थर रोड जेल, अनन्या पांडेचे घर आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्याच कडे राहिलेली दिसली आहे!! प्रसार माध्यमांवर शाहरुख खान, आर्यन खान, अनन्या पांडे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, समीर वानखेडे, नबाब मलिक, यास्मिन वानखेडे यांचीच नावे गाजविली जात आहेत.
सोशल मीडियावर मात्र आज दिवसभर भारताच्या 100 कोटी लसीकरणाचे जोरदार कौतुक होताना दिसत आहे. ट्विटर ट्रेंङवर 100 कोटींचे लसीकरण हाच विषय टॉप 10 मध्ये आहेत त्याच बरोबर सुमारे 6 तासांपेक्षा अधिक टॉपवर राहिला आहे. याखेरीज लसीकरणाशी संबंधितच अनेक हॅशटॅग शाहरुख खान, आर्यन खान आणि ड्रग्स यांच्या स्टोरीज यांना मागे टाकून पुढे असलेले दिसत आहेत.
सोशल मीडियाचा एकूण प्रभाव लक्षात घेतला तर मेनस्ट्रीम मीडिया त्याच्या किती मागे आहे हेच या निमित्ताने लक्षात येते. सोशल मीडियाने भारताचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण उचलून धरले आहे, तर मेनस्ट्रीम मीडिया मात्र आपले कॅमेरे आणि बुम्स घेऊन शाहरुख खान, आर्यन खान आणि अनन्या पांडे याच्याच मागे धावताना दिसला आहे.
India’s Rs 100 crore vaccination shines in the world;
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार, ‘ट्रुथ सोशल’ असणार नाव
- नवाब मलिकांचे जस्मिन वानखेडे यांच्यावर आरोप , मनसे झाली आक्रमक
- Farmers Protest : गाझीपूर बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी केला खुला, राकेश टिकैत म्हणाले – आम्ही बंदच कधी केला होता!
- NCB Raid : अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा, आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तर
- भारताच्या 100 कोटी लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून विशेष दखल
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम ; उदय सामंत यांची घोषणा, दिल्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना