• Download App
    कापड उद्योगात भारताचा चीनला धक्का, कोरोना काळात अमेरिकेतील निर्यात वाढली|India's push to China in the textile industry, increased exports to the US during the Corona period

    कापड उद्योगात भारताचा चीनला धक्का, कोरोना काळात अमेरिकेतील निर्यात वाढली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकेकाळी चीनची मक्तेदारी समजल्या जाणाºया कापड उद्योगात भारताने चीनला धक्का दिला आहे. कोरोना काळात चीनच्या निर्यातीचा मोठा हिस्सा भारताने हिसकावून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचा फायदा कापड उद्योगाला झाल आहे. बॅँकांकडून पतहमी मिळाल्यामुळे उद्योगांनी आपले उत्पादन वाढविले आहे.India’s push to China in the textile industry, increased exports to the US during the Corona period

    जागतिक पातळीवर धाग्याची निर्यात करणारा भारत हा चीननंतरचा दुसरा देश आहे. धाग्यांच्या आंतररा निर्यातीत भारताचा हिस्सा १४ टक्के आहे. घरगुती वस्त्रोद्योगातही भारताचा हिस्सा अकरा टक्के आहे. एकूण जागतिक कापड आणि वस्त्र व्यापारात भारताची एकूण उलाढाल चार टक्के आहे.



    इंडो काउंट इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश लालपुरीया म्हणाले, चीनचा कापड बाजारातील आयातदार देशांची चीनकडे पाहण्याची भूमिका बदलली आहे. चीनसारख्या देशावर अवलंबून राहणे योग्य नाही असे त्यांचे मत झाले आहे. त्याचबरोबर चीनने किंमतीही वाढविल्या आहेत.त्यामुळे अनेक देश सध्या भारताकडून आयात करण्यास प्राधान्य देत आहेत.

    गेल्या काही दिवसांपासून बांग्ला देश आणि व्हिएतनामची कापड निर्यात वाढल्याचे म्हटले जात होते. याबाबत लालपुरीया म्हणाले, बांग्ला देश आणि व्हिएतनामपेक्षा भारताला निर्यातीच्या संधी जास्त आहे. कारण भारतामध्ये कापूस लागवडीपासून उत्पादनापर्यंत संपूर्ण पुरवठा साखळी आहे. इतर देशांनी कापूस आणि सूती धाग्यासारख्या कच्च्या मालासाठी भारतावर अवलंबून राहावे लागते.

    मंधाना इंडस्ट्रीज लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक मनीष मंधाना यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकन अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करीत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आयात वाढली आहे. त्यामुळे भारतीय कापडाला मागणी वाढली आहे.

    India’s push to China in the textile industry, increased exports to the US during the Corona period

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य