• Download App
    जगात पहिल्यांदा भारताची Nasal Vaccine येणार, कोरोनाला हरवण्यासाठी सर्वात प्रभावी । Indias Nasal Vaccine will be the first in the world, most effective to defeat Corona

    जगात पहिल्यांदा येणार भारताची Nasal Vaccine, कोरोनाला हरवण्यासाठी सर्वात प्रभावी

    Nasal Vaccine : कोरोना महामारीला परास्त करण्यासाठी देशात लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. लसीकरणाचे आतापर्यंत दोन टप्पे झाले असून ताज्या आकडेवारीनुसार देशभरात 14 कोटींहून जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे. आता 1 मे पासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात 18 वर्षांपुढील सर्वांना लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. यादरम्यान, भारत बायोटेकचे एमडी डॉ. कृष्णा इल्ला यांनी त्यांच्या नाकातून दिल्या जाणाऱ्या लसीबाबत माहिती दिली. रिपब्लिक वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. कृष्णा इल्ला यांनी भारत बायोटेकच्या कोरोनावरील नाकावाटे देण्यात येणार लसीच्या सद्य:स्थितीवर प्रकाश टाकला. Indias Nasal Vaccine will be the first in the world, most effective to defeat Corona


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना महामारीला परास्त करण्यासाठी देशात लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. लसीकरणाचे आतापर्यंत दोन टप्पे झाले असून ताज्या आकडेवारीनुसार देशभरात 14 कोटींहून जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे. आता 1 मे पासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात 18 वर्षांपुढील सर्वांना लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. यादरम्यान, भारत बायोटेकचे एमडी डॉ. कृष्णा इल्ला यांनी त्यांच्या नाकातून दिल्या जाणाऱ्या लसीबाबत (Bharat Biotech Nasal Vaccine) माहिती दिली. रिपब्लिक वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. कृष्णा इल्ला यांनी भारत बायोटेकच्या कोरोनावरील नाकावाटे देण्यात येणार लसीच्या सद्य:स्थितीवर प्रकाश टाकला.

    डॉ. कृष्णा म्हणाले की, नाकाद्वारे दिली जाणारी लस सर्वात प्रभावी ठरणार आहे. इंजेक्शनद्वारे देण्यात येणारी लस ही फुप्फुसातील फक्त वरच्या आणि खालच्या भागाचे संरक्षण करते. याद्वारे नाकाचे संरक्षण होत नाही. लसीकरण होऊनही लोकांना पुन्हा कोरोनाची लागण हे प्रमुख कारण आहे. अशा स्थितीत नाकावाटे लस दिल्यास संसर्ग झाल्यावरही रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येणार नाही. दोन ते तीन दिवस ताप जरूर येतो, परंतु कोरोना संसर्गामुळे मृत्यूची शक्यता अत्यंत कमी होते.

    नाकावाटे दिली जाणारी लस सर्वात प्रभावी

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही लस देण्याच्या पद्धती व कार्यपद्धती यावर चर्चा करताना डॉ. कृष्णा म्हणाले, “नाकावाटे लसीचा एकच डोस कोरोना संसर्ग रोखण्यास सक्षम आहे. अशाप्रकारे, कोरोना संक्रमणाची साखळी तोडली जाऊ शकते आणि वेगाने वाढणारी नवीन रुग्णसंख्या आटोक्यात येते. पोलिओ ड्रॉपप्रमाणेच त्याचे 4 थेंबही पुरेसे आहेत. दोन थेंब नाकाच्या एका छिद्रात आणि दोन थेंब नाकाच्या दुसऱ्या छिद्रात कोरोनापासून बचावासाठी प्रभावी ठरतील. जागतिक आरोग्य संघटनेसारख्या जागतिक संस्थादेखील नाकावाटे तयार होणाऱ्या लसीमुळे समाधान व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते, सुईने होणाऱ्या लसीकरणामुळे संसर्ग थांबत नाही. अशा परिस्थितीत नेजल व्हॅक्सिलवरून जागतिक स्तरावर भागीदारी असेल, बायोटेक कंपनीची तशी योजना आहे.

    कोव्हॅक्सिन 81 टक्के प्रभावी

    विशेष म्हणजे मार्चमध्ये भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा निकाल जाहीर केला होता. भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार कोव्हॅक्सिन कोरोना रोखण्यात 81 टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे. चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात 25,800 लोक सहभागी होते. भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर यापूर्वी कोणतीही क्लिनिकल चाचणी झाली नव्हती. विशेष म्हणजे 3 जानेवारी रोजी डीजीसीआयने आपत्कालीन परिस्थितीत कोव्हॅक्सिन वापरण्यास परवानगी दिली. विशेष म्हणजे कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 1567.50 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याव्यतिरिक्त बंगळुरू येथे प्लँटमध्ये उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी 65 कोटी रुपयांचे अनुदान स्वतंत्रपणे देण्यात आले आहे. अशाप्रकारे कोव्हॅक्सिनचे 6 ते 7 कोटी डोस जुलैपर्यंत दरमहा तयार होणार आहेत.

    Indias Nasal Vaccine will be the first in the world, most effective to defeat Corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार