भारताचे गुंतवणूक गुरू असलेले राकेश झुनझुनवाला पैंज लावायला तयार आहेत की भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही त्यामुळे मार्केटमधील गुंतवणूकदारांनी काळजी करू नये असे झुनझूनवाला यांनी म्हटले आहे.India’s investment guru Rakesh Jhunjhunwala says the third wave of Corona will not come
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे गुंतवणूक गुरू असलेले राकेश झुनझुनवाला पैंज लावायला तयार आहेत की भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही त्यामुळे मार्केटमधील गुंतवणूकदारांनी काळजी करू नये असे झुनझूनवाला यांनी म्हटले आहे.
देशात कोरोनाच्या दुसºया लाटेने कहर केला होता. आता तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. परंतु भारतातील वॉरेन बफे म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध उद्योगपती राकेश झुनझूनवाला यांनी तिसरी लाट येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
झुनझुनवाला म्हणाले, जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या तिसरी लाट आली आहे. भारतातही तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु भारतात सुरू असलेले लसीकरण आणि आतापर्यंत झालेल्या संसगार्चा विचार करता लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढली आहे.
त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची सुताराम शक्यता नाही.तिसरी लाट आली तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार नाही. उलट काही सुधारणा होऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरू नये. शेअर बाजार सकारात्मकच राहिल.
India’s investment guru Rakesh Jhunjhunwala says the third wave of Corona will not come
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात निवडणुकांमुळे कोरोना वाढला, मग महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सवाल
- बांताक्रुझ ! नवी मुंबई विमानतळाच्या नावासाठी आणखी एक प्रस्ताव, तणाव कमी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पूरी यांचा संता- बांता जोकचा आधार
- काय शिजतंय? शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा
- जम्मू काश्मीरबाबत सर्वपक्षीय बैठकीतून पंतप्रधानांचा पुढाकार चांगला, बसपच्या सुप्रिमो मायावती यांनी केले कौतुक
- मोदी सरकारने करून दाखविले, कर्जबुडव्यांकडून बॅँकांची ८० टक्यांहून अधिक रक्कम वसूल, मल्या, चोक्सी, निरव मोदीची १८ हजार १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त