विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय लसींना नाकारणाºया युरोपियन युनियनच्या निर्णयाला भारतही चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. कोेव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा समावेश ग्रिन पासपोर्टमध्ये केला नाही तर युरोपातील लसींनाही भारतात मान्यता दिली जाणार नाही. हे लसीकरण झालेल्यांना भारतात प्रवेश केल्यावर क्वारंटाईन व्हावे लागेल, असा निर्णय घेण्याची शक्यता आहे.India’s clear response to EU, if covaxin,covacin, covshield are not allowed your vaccines also will not be considered
भारताच्या परराष्ट्र विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपियन युनियनच्या ग्रिन पासपोर्टसाठी प्रमाणपत्रात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांचा समावेश केला जात नाही तोपर्यंत युरोपातून भारतात येणाºयांना क्वारंटाईन व्हावे लागेल.
सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्फुटनिक व्ही या लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस लस मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
आकडेवारीनुसार, एकूण लसीकरणांतर्गत ८८ टक्के कोव्हिशिल्डच्या लसी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कोव्हिशिल्ड लस घेतलेले प्रवासी हे युरोपीय संघातील देशांच्या ग्रीन पास किंवा व्हॅक्सिनेशन पासपोटसाठी पात्र ठरणार नाहीत. युरोपीयन संघात सहभागी असलेल्या अनेक देशांनी डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे.
या पासपोर्टमुळे संबंधित व्यक्ती कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम असल्याचे प्रमाणित करेल, असे सांगितले जात आहे. युरोपीय देशांमध्ये कामासाठी, पर्यटनासाठी वा अन्य कारणांसाठी जाणाऱ्यांना डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट आवश्यक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
युरोपीय मेडिसिन एजन्सीने आतापर्यंत चार कोरोना लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये फायझर, मॉर्डना, एस्ट्राजेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सनचा समावेश आहे. या चार लसींचे डोस घेतलेल्यांनाच युरोपीय संघांच्या देशांमध्ये प्रवेश मिळू शकेल. एस्ट्राजेनेका या लसीचे संस्करण असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेल्या कोव्हिशिल्ड लसीला मात्र युरोपीय संघात मान्यता देण्यात आलेली नाही.
युरोपीय संघात एस्ट्राजेनेकाचे संस्करण असलेल्या वॅक्स्झर्वरिया या लसीला मान्यता असून, ती ब्रिटनमध्ये तयार केली जाते. कोव्हिशिल्ड लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. परंतु, युरोपीय संघाने या लसीला मान्यता दिलेली नाही, असे सांगितले जात आहे.
India’s clear response to EU, if covaxin,covacin, covshield are not allowed your vaccines also will not be considered
महत्त्वाच्या बातम्या
- लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवा, लोकांना प्रोत्साहित करा, पंतप्रधानांचे मंत्र्यांना आवाहन
- पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये, बुरखा फाटतोय म्हणून धमक्या, शिवीगाळ, मोटारीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा आरोप
- ट्विटरवरील सर्व अश्लिल मजकूर काढून टाका, राष्टीय महिला आयोगाची दिल्ली पोलीसांकडे मागणी
- कोरोनाचे फुकट श्रेय घेणाऱ्या केजरीवालांना भाजपाने सुनावले
- Changes From 1st July : 1 जुलैपासून बँकिंग, करासह होत आहेत हे 9 बदल, तुमच्या खिशावर असा होणार परिणाम