भारत आंतरराष्ट्रीय बाजारातून स्पर्धात्मक दारातून कोणाकडूनही कोणतीही वस्तू खरेदी करेल हेच आता भारताचे मंत्री, राजनैतिक अधिकारी मुत्सद्दी जागतिक मंचावर सांगताना दिसतात, हा “मोदी डिप्लोमसी”तला बदल आहे!! India’s assertive diplomacy in Davis by piyush goyal
भारताने रुपया आणि रुबल विनिमय दराचे नियोजन करून रशियाकडून तेल खरेदी करण्याचा विचार सुरू केल्यानंतर युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यासारख्या बड्या देशांकडून भारतावर कटाक्ष टाकला गेला. मात्र या मुद्द्यावर मोदी सरकार ठाम असून आंतरराष्ट्रीय बाजारात कोणाकडून काय खरेदी करायचे आम्ही ठरवू. त्यात राष्ट्र हित जपू असे प्रत्युत्तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दावोसमध्ये दिले आहे.
दोनच आठवड्यांपूर्वी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी रशियाकडून भारताच्या तेल खरेदीच्या मुद्द्यावरच परदेशातल्या पत्रकारांना फटकारले होते. भारत रशियाकडून वर्षभरासाठी जेवढे तेल खरेदी करू इच्छितो, तेवढे तेल एकटा युरोप एका दुपारपर्यंत खरेदी करतो, असे जयशंकर यांनी युरोपियन युनियन मधल्या देशांना सुनावले होते.
जयशंकर यांच्याच मुद्द्यावर पुढे पाऊल टाकत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारताचे राष्ट्रीय हित साधले जाईल अशाच पद्धतीने तेल खरेदी आणि अन्य वस्तूंची खरेदी – विक्री होईल, असे दावोसमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला सांगितले आहे.
युरोपियन युनियन मधील देशांनी स्वतःचे हित जपण्यासाठी जर पावले टाकण्याचे अधिकार असतील भारतालाही आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी ते अधिकार आहेत. इंधनाच्या खरेदीसाठी भारताला देखील जागतिक पातळीवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पर्याय भारताने स्वीकारला तर हरकत काय आहे??, असा परखड सवाल पियुष गोयल यांनी केला आहे. भारतही आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स वरून आयात निर्यात धोरण ठरवू शकतो, हा मुद्दा पियुष गोयल यांनी आवर्जून अधोरेखित केला आहे.
– गहू निर्यात बंदी कायमच
त्याच वेळी केंद्र सरकारने नुकतीच गहू निर्यातीवर बंदी घातली. या बंदी वरून अमेरिका आणि युरोपियन युनियन मधील देशांनी भारतावर टीकास्त्र सोडले होते. परंतु याबाबत देखील पियूष गोयल यांनी भारताची भूमिका स्पष्ट शब्दात या देशांना सांगितली. नफेखोर मध्यस्थांना गहू विकण्यापेक्षा दोन देशांमध्ये जर करार होत असेल तर भारताला गहू निर्यात करण्यात काही अडचण नाही. पण तसे होत नसल्यामुळे भारत आणि गहू निर्यातीवर बंदी घातल्याचे गोयल यांनी स्पष्ट केल्याने युरोपियन युनियन मधील देशाचीच अडचण झाली आहे.
पियुष गोयल यांनी दावोस मधल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीत तर ही बाब अधोरेखित केलीच पण प्रसारमाध्यमांच्या खास मुलाखतीमध्ये देखील भारताची भूमिका आवर्जून सांगितली. संपूर्ण जग महागाईच्या आगीत होरपळत असताना भारताने आपल्या देशातील महागाई कमी करण्यासाठी जर काही कठोर उपाययोजना केल्या आंतरराष्ट्रीय बाजारातले उपलब्ध पर्याय स्वीकारले तरी युरोपियन युनियन मधील देशांना किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी देखील काय अडचण आहे?? भारत आपल्या राष्ट्रीय हिताशी तडजोड करणार नाही. तडजोड करण्याचे कारण नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये पियुष गोयल यांनी सुनावले आहे.
– मोदी डिप्लोमसीतला फरक
भारताच्या डिप्लोमसी मधला हा मूलभूत फरक आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये ब्रिटिश नोकरशाहीतील काही अधिकारी यांचा हवाला देऊन भारतातले आयएफएस अधिकारी आता ऐकत नाहीत त्यांनी आता असे करू नये, असे सुनावले होते. परंतु राहुल गांधींच्या या टिपणी ला देखील त्यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी उत्तर दिले होते. भारताचे आयएएस अधिकारी आता राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने आपली भूमिका मांडतात ते कोणाचीही कुठलीच गोष्ट जर ती अतार्किक असेल तर ऐकत नाहीत असे जयशंकर यांनी आवर्जून नमूद केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातल्या डिप्लोमसी फरक आहे. त्यांचे मंत्री जयशंकर आणि पियुष गोयल यांनी थेट आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांमध्ये भारत कसा वागेल आणि कसा वागतो, हे दाखवून दिले आहे. भारतातले अर्थमंत्रालय रशियाकडून तेल खरेदी करताना रुपया रूबल विनिमय दराचा दराचे नियोजन करून पुढचे पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर पियुष गोयल जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय मंचान वरून दिलेली प्रत्युत्तरे अधिक डोळे उघडणारी किंबहुना अमेरिका युरोपियन युनियन मधील देश यांच्यासारख्या बड्या देशांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहेत. हे निश्चित!!
India’s assertive diplomacy in Davis by piyush goyal
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण संघटना शरद पवारांकडे चर्चेला गेल्याच कशाला??; प्रकाश महाजन यांचा परखड सवाल
- पेट्रोल – डिझेल : रुपया – रूबल दर विनिमय दराच्या नियोजनातून रशियाकडून स्वस्त तेल खरेदीची मोदी सरकारची तयारी
- खंजीर खुपसण्याची भाषा जपून वापरा!!; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा मराठा संघटनांना इशारा
- चिंतन फळता फळेना; गळती थांबता थांबेना!!; कपिल सिब्बल काँग्रेस सोडून समाजवादीच्या पाठिंब्यावर राज्यसभेच्या वाटेवर!!