विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणारी अमेरिकेची कंपनी मॉडर्नाने भारताला लशीचे ७५ लाख डोस देण्याची तयारी दाखविली आहे. कोव्हॅक्स जागतिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत मॉडर्नाची लस भारतात येणार आहे. नुकसान भरपाईचा कलमाच्या कलमावर एकमत होत नसल्याने लस भारतात कधी येणार हे स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. Indian will get 75 lack moderna dose
भारतात मॉडर्नाची लस उपलब्ध व्हावी, यासाठी अमेरिकी कंपनीबरोबर चर्चा सुरू असल्याचे सरकारने गेल्या आठवड्यात सांगितले होते. मॉडर्नाच्या लशीच्या तातडीच्या वापरासाठी भारताच्या औषध नियामक संस्थेने गेल्या महिन्यात परवानगी दिली होती.
मॉडर्नाची लस देशात कधी उपलब्ध होऊ शकेल, याबद्दल माहिती देताना नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हणाले होते की, ही लस आयात करून भारतात उपलब्ध करण्याबाबत कंपनीबरोबर चर्चा सुरू आहे. कंपनीबरोबर करण्यात येणाऱ्या करारात नुकसान भरपाईच्या कलमाचा समावेश करण्यासबंधी भारत सरकारने काही अटी घातल्या आहे.
Indian will get 75 lack moderna dose
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट, DA 11% वाढून 28% केला, जाणून घ्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ
- फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट
- Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशनला दान दिल्यास टॅक्समध्ये मिळेल पाच वर्षांसाठी सूट
- गोव्यातही 300 युनिट मोफत वीज देणार केजरीवाल, सत्ता आल्यास जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन
- Maha Electric Vehicle Policy : महाराष्ट्रात विद्युत वाहन धोरण जाहीर, काय आहेत तरतुदी, वाचा सविस्तर