• Download App
    रिचा चढ्ढाकडून भारतीय जवानांचा अपमान; काँग्रेस नेता अभिनेत्री नगमा कडून रिचाचे समर्थन Indian soldier insulted by Richa Chadha

    रिचा चढ्ढाकडून भारतीय जवानांचा अपमान; काँग्रेस नेता अभिनेत्री नगमा कडून रिचाचे समर्थन

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय सैन्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने खिल्ली उडवली. अभिनेता फझल अली याच्याशी निकाह केल्यानंतर दीड महिन्यातच तिने भारतीय सैन्याचा अवमान केला. भारतीय सैन्याची खिल्ली उडवणारे ट्विट केले. त्यामुळे सोशल मीडियात तिच्याविरुद्ध संताप उसळला आहे. मात्र त्या रिचा चढ्ढाचे काँग्रेसने समर्थन केले आहे. काँग्रेसच्या नेत्या, अभिनेत्री नगमा मोरारजी हिने याचे समर्थन केले आहे. Indian soldier insulted by Richa Chadha

    दोन दिवसांपूर्वी भारतीय लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी महत्वाचे वक्तव्य केले. ‘आम्ही पाकिस्तानकडून पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्यास सक्षम आहोत. आम्ही सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहोत. पाकिस्तान काही कृती करण्याआधीच आम्ही आमचे ऑपरेशन पूर्ण करू’, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर रिचा चढ्ढा हिने ‘गलवान सेज हाय’ अर्थात ‘गलवान आठवण करत आहे’. अशा प्रकारे रिचाने थेट भारतीय सैनिकांची खिल्ली उडवली. गलवानचा उल्लेख करून रिचाने भारतीय सैनिकांच्या क्षमतेची चेष्टा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.



     

    रिचाच्या ट्विटवर माजी कर्नल अशोक कुमार सिंह यांनी लिहिले की, “रिचा चढ्ढाच्या गलवान ट्विटवर वाद. मला वाटत नाही की तिने सैनिकांच्या बलिदानाची खिल्ली उडवली आहे, तर ती एका सर्व्हिंग जनरलने निवडणुकीत भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी केलेल्या राजकीय विधानाला लक्ष्य करत होती. जेव्हा सैन्याचे राजकारण होते तेव्हा टीका आणि उपहासासाठीही तयार राहा, असे म्हटले. त्यावर कर्नलच्या या ट्विटला रिट्विट करत नगमाने लिहिले, ‘अगदी बरोबर सांगितले.’

    काँग्रेसच्या एका महिला नेत्याचे असे ट्विट पाहिल्यानंतर युजर्स भडकले आणि लष्कराच्या जवानांबद्दल अपशब्द बोलणारी ती आहे कोण?, अशा शब्दांत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

    Indian soldier insulted by Richa Chadha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती