जागतिक वाय-फाय दिवसाच्या निमित्ताने रेल्वेने काश्मीरी नागरिकांना भेट दिली आहे. काश्मीर खोऱ्यातील सर्व १५ रेल्वे स्टेशनवर आता वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.Indian Railwaysgift to Kashmiri citizens, WiFi service available at all 15 railway stations
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जागतिक वाय-फाय दिवसाच्या निमित्ताने रेल्वेने काश्मीरी नागरिकांना भेट दिली आहे. काश्मीर खोऱ्यातील सर्व १५ रेल्वे स्टेशनवर आता वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.भारतीय रेल्वेच्या सार्वजनिक वायफायला रेल वायर नावाने ओळखले जाते.
या वायफाय नेटवर्कशी काश्मीरमधील सर्व १५ रेल्वे स्टेशन या सेवेशी जोडण्यात आली आहे. प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे.श्रीनगर, बारामुल्ला, हम्रे, पट्टन, मजहोम, बडगाम, श्रीनगर, पंपोर, काकापोरा, अवंतीपुरा, पंजगाम, बिजबेहरा, अनंतनाग, सादुरा, काजीगुंड आणि बनिहाल या रेल्वे स्टेशनचा यामध्ये समावेश आहे.
जम्मू विभागातील चारही जिल्हा मुख्यालयांसह १५ रेल्वे स्टेशनवर यापूर्वीच वायफाय सेवा देण्यात आली आहे.रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, जागतिक वायफाय दिवसाच्या निमित्ताने श्रीनगर आणि काश्मीरमधील १४ रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वायफाय नेटवर्कचा भाग आता काश्मीरमधील रेल्वे स्टेशन बनले आहेत. रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांना त्याचा लाभ होईल. स्मार्टफोन असणारे ही सुविधा वापरू शकणार आहेत. त्यासाठी केवायसी करणे गरजेचे असणार आहे.
Indian Railwaysgift to Kashmiri citizens, WiFi service available at all 15 railway stations
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडिया कंपन्यांनी भारताला लोकशाही शिकवू नये, भारतात नफा कमवायचा असेल तर कायदा पाळावा लागेल, रविशंकर प्रसाद यांचा इशारा
- CM Sarma In Action : आसाम सरकारचा मोठा निर्णय, वीज बिल पूर्णपणे भरल्यानंतरच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळेल वेतन
- कधीपासून सुरू होणार मुंबई लोकल? वाचा काय म्हणाल्या महापौर पेडणेकर
- दरमहा 2500 रुपये, मोफत शिक्षण, आरोग्य आणि पक्के घरसुद्धा;, अनाथ बालकांना ओडिशा सरकारचा ‘आशीर्वाद’