• Download App
    भारतीय आरोग्य क्षेत्राने संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला, १०० देशांना निर्यात केले कोरोना लसीचे ६.५ कोटी डोस, पंतप्रधानांनी केले कौतुक|Indian health sector gains global trust, exports 6.5 crore doses of corona vaccine to 100 countries, PM praises

    भारतीय आरोग्य क्षेत्राने संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला, १०० देशांना निर्यात केले कोरोना लसीचे ६.५ कोटी डोस, पंतप्रधानांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राने संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला आहे. भारताने यंदाच्या वर्षी सुमारे १०० देशांना कोरोना लसीचे ६.५ कोटी डोस निर्यात केले, असे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.Indian health sector gains global trust, exports 6.5 crore doses of corona vaccine to 100 countries, PM praises

    औषधनिर्मिती क्षेत्रातील एका परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मोदी म्हणाले की, औषधे तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करून या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनविण्याचा आमचा संकल्प आहे. त्याकरिता अनुकूल अशी धोरणे केंद्र सरकार राबवत आहे.



    देशातील औषधनिर्मिती क्षेत्रामुळे सुमारे ३० लाख लोकांना रोजगार मिळतो, तसेच १३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही मोलाचा हातभार लागत आहे.
    त्यांनी सांगितले की, २०१४ सालापासून भारतीय आरोग्य क्षेत्रामध्ये १२ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे.

    अशा प्रकारची आणखी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. औषधे व लसींकरता लागणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचे उत्पादन स्वदेशातच होण्याकरिता औषधनिर्मिती कंपन्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. या क्षेत्रात अजून भारताने मोठी कामगिरी करण्याची गरज आहे.मोदी म्हणाले, भारतामध्ये उत्तम प्रतिभेचे शास्त्रज्ञ आहेत. हे आपल्या देशाचे खरे सामर्थ्य आहे. त्याचा योग्य उपयोग करून संशोधनाच्या कक्षा आपण विस्तारल्या पाहिजेत.

    Indian health sector gains global trust, exports 6.5 crore doses of corona vaccine to 100 countries, PM praises

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य