विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांनी रशियन बाजारपेठ सोडणाऱ्या पाश्चात्य उत्पादकांची जागा घेऊ शकतात. भारतातील रशियन राजदुतांनी शुक्रवारी सांगितले की, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणखी परदेशी कंपन्या माघार घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. नवनियुक्त रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी रोसिया 24 ब्रॉडकास्टरला सांगितले की, भारत एक वर्ल्ड फार्मसी आहे आणि जेनेरिक औषधांचा अग्रगण्य उत्पादक आहे, जे मूळ औषधांपेक्षा निकृष्ट नाहीत.Indian companies urged to replace foreign companies in Russia in the wake of Ukraine war
अलीपोव्ह यांनी सांगिते की, रशियन बाजारातून अनेक पाश्चिमात्य कंपन्यांनी माघार घेतल्याने आणि ज्या जागा रिकाम्या झाल्या आहेत, तिथे खरे तर अनेक उद्योगांमध्ये विशेष करून फार्मास्यूटिकल्स मध्ये भारतीय कंपन्या ताबा मिळवू शकतात.
युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल पाश्चिमात्य देश रशियावर कठोर निर्बंध लादत असल्याने, सध्या सुरू असलेल्या संघर्षात बाजू निवडण्यासाठी भारतावर प्रचंड दबाव आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे पालन करण्याच्या गरजेवर भर देत रशियाच्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघातील ठरावांवर मतदान करण्यापासून भारताने स्वत:ला ठेवले आहे.
अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी रशियन तेल आणि गॅस कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून सवलतीत तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जेन साकी यांनी सांगितले की, रशियाकडून सवलतीच्या दराने तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाबाबत अमेरिका विविध स्तरांवर भारतीय नेत्यांच्या संपर्कात आहे.
Indian companies urged to replace foreign companies in Russia in the wake of Ukraine war
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच्या नगरसेविकेला कॉँग्रेसकडून विधानसभेसाठी उमेदवारी, कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर
- नक्षलवाद, प्रायोजित दहशतवाद आणि बंडखोरांचा होणार बिमोड, सीआरपीएफवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास
- पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले लोकमान्यता असलेले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना विषप्रयोगाची भीती, हजारांवर वैयक्तिक कर्मचाऱ्याना नोकरीवरून टाकले काढून