• Download App
    पॉझिटिव्ह न्यूज : या भारतीय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हुंडा घेणे महागात पडणार, मागणी केल्यास जाणार नोकरी । Indian CEO Of UAE-Based Firm Introduces Strict Anti-Dowry Policy For Employees

    पॉझिटिव्ह न्यूज : या भारतीय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हुंडा घेणे महागात पडणार, मागणी केल्यास जाणार नोकरी

    Anti-Dowry Policy : हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठी एका कंपनीने एक अनोखी सुरुवात केली आहे. शारजाह स्थित एरिस ग्रुप अँड कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांवर हुंडाविरोधी धोरण लागू केले आहे. म्हणजेच जर या कंपनीत काम करणारे कर्मचारी हुंड्याची मागणी करत असतील तर त्यांना त्यांच्या नोकर्‍या गमवाव्या लागतील आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते. कंपनी अनेक देशांमध्ये व्यवसाय करीत आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन रॉय यांनी जगात पहिल्यांदाच हुंडाविरोधी धोरणाला एखाद्या संस्थेच्या रोजगार कराराचा भाग बनवले आहेत. एक भारतीय कंपनी म्हणून हे अतिशय कौतुकास्पद पाऊल आहे. Indian CEO Of UAE-Based Firm Introduces Strict Anti-Dowry Policy For Employees


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठी एका कंपनीने एक अनोखी सुरुवात केली आहे. शारजाह स्थित एरिस ग्रुप अँड कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांवर हुंडाविरोधी धोरण लागू केले आहे. म्हणजेच जर या कंपनीत काम करणारे कर्मचारी हुंड्याची मागणी करत असतील तर त्यांना त्यांच्या नोकर्‍या गमवाव्या लागतील आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते. कंपनी अनेक देशांमध्ये व्यवसाय करीत आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन रॉय यांनी जगात पहिल्यांदाच हुंडाविरोधी धोरणाला एखाद्या संस्थेच्या रोजगार कराराचा भाग बनवले आहेत. एक भारतीय कंपनी म्हणून हे अतिशय कौतुकास्पद पाऊल आहे.

    हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यावर्षी 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त कंपनीने वेश्यावृत्तिविरोधी कायद्याचा प्रस्ताव दिला होता. या आठवड्यात कंपनीने याची अंमलबजावणी केली आहे. हे धोरण 16 देशांमधील कंपनीच्या शाखांमध्ये कार्यरत असलेल्या भारतीयांसह सर्व कर्मचार्‍यांवर काटेकोरपणे लागू केले आहे. नवीन नियमांनुसार, भविष्यात हुंडा घेणाऱ्या किंवा देणाऱ्या कोणत्याही कर्मचार्‍यास पुढे काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

    हुंडाविरोधी जागरूकता अभियान चालविण्याच्या सूचना

    कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या कराराचे नूतनीकरण करण्यासाठी प्रथम हुंडाविरोधी धोरणावर सही करणे बंधनकारक केले आहे. यासह हुंडाविरोधी जागरूकता मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    Indian CEO Of UAE-Based Firm Introduces Strict Anti-Dowry Policy For Employees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!