विशेष प्रतिनिधी
श्रीनगर: दहशतवादी संघटनांचा मोठा मार्गदर्शक हाजी आरिफचा भारतीय लष्कराने खात्मा केला. हाजी आरिफ हा आधी पाकिस्तानच्या सैन्यात होता. पण दहशतवादी संघटनांशी असलेले त्यांचे संबंध पाहता पाकिस्तान प्रशासनाने त्याला सीमेजवळ जमीन दिली आणि त्याला पाकिस्तानच्या धारकुंडी खुरैता सेक्टरचा लाँच पॅड कमांडर बनवले होते.Indian Army kills Haji Arif who was guide to terrorist organizations
पाकिस्तानी सैन्य आणि पाकची गुप्तचर संस्था आयएसआयसह दहशतवादी संघटनांना यामुळे मोठा झटका बसला आहे. दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणार असल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलांना मिळाली होती. या गटात लश्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी असू शकतात, अशीही माहिती मिळाली होती.
माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी भिंबर गली आणि आसपासच्या भागाला वेढा घातला. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव हाजी आरिफ असे आहे.
हाजी आरिफला लाँचिंग पॅडचा कमांडरही बनवण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतीय हद्दीत दहशतवाद्यांची घुसखोरी करत होता. या कामात पाकिस्तानी स्पेशल फोर्स आणि पाक रेंजर्सही त्याला साथ देत होते. आरिफ याआधी पाकिस्तानी सैन्यात होता.
पण त्यादरम्यान त्याचे दहशतवादी संघटनांशी चांगले संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर त्याला पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयने धारकुंडी खुरैता सेक्टरमध्ये जमीन दिली होती आणि तिथून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी करावी असे त्याला सांगण्यात होते.
Indian Army kills Haji Arif who was guide to terrorist organizations
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणी लोकांना राजकारणाविना सहाय्य मिळावे, रशिया, चीनने भारतासोबत एकत्र यावे, एस. जयशंकर यांची भूमिका
- राजकीय पंगा संसदेच्या अंगणात; काँग्रेसच्या ऐक्य प्रयत्नांना “तृणमूळी” खोडा; ममतांचे ऐक्य प्रयत्न स्वत;च्या अटी शर्तींवर!!
- गोव्यात चिदंबरम येतात, नुसते फिरून निघून जातात!!;काँग्रेसवर हल्लाबोल करत तृणमूळच्या महुआ मोईत्रांचा मात्र मुक्काम!!
- पुणे जिल्ह्यात 1 डिसेंबरपासून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी, पण कोरोना नियमावली पाळूनच!!