• Download App
    दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याकडून खात्मा|Indian Army eliminates terrorists in South Kashmir

    दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याकडून खात्मा

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अवंतीपोराच्या पंपोर भागात आज भारतीय सैन्यानं दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केला. ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे होते. त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये नागरिकांची हत्या ही केली होती. एक रायफल आणि एक पिस्तूल जप्त केले आहे.Two Hizb-ul-Mujahideen terrorists neutralised by security forces in Jammu and Kashmir

    ठार झालेल्या एका दहशतवाद्याचा नाव मुसाएब मुश्ताक आहे. मुसाएब हा खिरयूचा रहिवासी आहे. त्यानं २३ जुलैला सरकारी शाळेतील एका शिपायाची हत्या केली होती.गुरुवारी श्रीनगरच्या सराफ कदल भागात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यात दोन पोलिसांसह तीन जण जखमी झाले.दहशतवाद्यांनी रात्री सुरक्षा दलाच्या वाहनावर ग्रेनेड फेकलं. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.



    गुरुवारी राजौरी जिल्ह्यातील थानामंडी भागात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले. भारतीय सैन्याचा एक JOC हुतात्मा झाला. एका पोलीस अधिकाऱ्यांनं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जवानांनी थानामंडी भागात सर्च ऑपरेशन सुरु केलं होते.

    Indian Army eliminates terrorists in South Kashmir

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य