वृत्तसंस्था
नवी दिल्ली : युक्रेन रशिया युद्धाला सहा महिने होत आले आहेत. परंतु, भारतीय हवाई दलाला त्याचा परिणाम सहन करावा लागलेला नाही. हवाई दलातील विमानांना स्पेअर पार्ट्ची कमतरता भासलेली नाही. कारण तब्बल 62000 कोटी रुपयांचे स्पेअर पार्ट्स भारतीय हवाई दलाने भारतातूनच खरेदी केली आहेत, अशी महत्वपूर्ण माहिती हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी दिली आहे.indian Air Force’s dependence on Russia reduced
हवाईदल प्रमुखांच्या या वक्तव्यातून आत्मनिर्भर भारत योजनेचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित होत आहे. आत्तापर्यंत भारत लष्करी सामग्री साठी रशिया सारख्या देशांवर अवलंबून होता. परंतु, आता आत्मनिर्भर भारत योजनेतून संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. हवाईदल प्रमुखांचे वक्तव्य हे त्याचे निदर्शक आहे.
युक्रेन – रशिया युद्धाला 6 महिने झाल्यानंतर देखील हवाई दलाच्या भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत कोणतीही कमतरता आलेली नाही. कारण त्या देशांकडून आत्तापर्यंत खरेदी करत असलेले स्पेअर पार्ट्स भारतातच खरेदी केले जात आहेत. याची रक्कम तब्बल 62 हजार कोटी रुपये आहे. अर्थातच भारतीय हवाई दलाचे रशिया आणि युक्रेनवर असलेले परावलंबित्व कमी झाले आहे. कारण आता आत्मनिर्भर भारत योजनेतून स्वदेशीला व्यावहारिक पातळीवर देखील प्रोत्साहन दिले जात आहे, असे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी स्पष्ट केले आहे
भारत – चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्थिती सर्वसामान्य होण्याची गरज आहे. पण त्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य आपापल्या जुन्या पोझिशन्स वर गेले पाहिजे. काही ठिकाणी डिस्एंगेजमेंट झाली आहे, हे खरे आहे. पण आम्ही सतर्क राहून सीमेवर निगराणी करत आहोत. चिनी हवाई दल आणि चिनी सैन्य यांच्या हालचालींवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत, असे हवाईदल प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.
3000 अग्निवीरांची भरती
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेतून 3000 अग्निवीरांची भरती भारतीय हवाई दलात केली जाईल. पुढील वर्षापासून ते प्रत्यक्ष कार्यरत होतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
indian Air Force’s dependence on Russia reduced
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्याच हस्ते महर्षी पुरस्कार स्वीकारताना सुशीलकुमारांनी काढली वसंतदादांचे सरकार पवारांनी पाडल्याची आठवण
- लम्पी आजारातून गोधन संपवण्याचा भाजप सरकारचा डाव, लम्पीग्रस्त नायजेरियातून आणले चित्ते!; नानांचा जावईशोध
- एसटी गाड्यांचे बुकिंग : दसरा मेळाव्यासाठी किती पण होऊ दे खर्च; ठाकरे – शिंदे गर्दी ‘खेचण्यात’ गर्क
- कॅनडात भगवद् गीता पार्कमध्ये तोडफोड : भारताने केला निषेध, हेटक्राइमच्या चौकशीचे आदेश