विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : १५ ऑक्टोबर पासून चार्टर्ड विमानातून प्रवास करणाऱ्या विदेशी पर्यटकांना भारत सरकारकडून टुरिस्ट विसा देण्यात येईल. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
India will grant tourist visas to foreigners traveling through Chartered flights from October 15
गृहमंत्रालयाने त्यांच्या आदेशामध्ये असे सांगितले की, चार्टर्ड फ्लाइट्स व्यतिरिक्त इतर फ्लाईटनी येणाऱ्या विदेशी पर्यटकांसाठी १५ नोव्हेंबर पासून विसा दिला जाईल. कोरोनामुळे सर्व विसा बंद करण्यात आले होते. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासावर इतर अनेक बंधने ही कोरोनाचा प्रसार कमी होण्यासाठी घातली गेली होती. राज्य सरकारकडून तसेच पर्यटनक्षेत्राकडून टुरिस्ट विसा देण्याबद्दल मागणी होत होती.
MHA नी इतर मंत्रालयांबरोबर आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पर्यटन परराष्ट्र व्यवहार व नागरी वाहतूक मंत्रालय) आणि जिथे परदेशी प्रवासी येतात अश्या राज्यांच्या सरकारबरोबर चर्चा केली. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासातील काही नियमांमध्ये या निर्णयामुळे थोडी सवलत मिळाली आहे.
India will grant tourist visas to foreigners traveling through Chartered flights from October 15
महत्त्वाच्या बातम्या
- आता मुलीही लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतील, संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी , पुढील सत्रापासून प्रवेश सुरु
- युपीएससी इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त स्कोर मिळवलेल्या डॉ. अपला मिश्राने मुलाखतीत ‘ही’ उत्तरे दिली होती
- मेनका गांधी वरुण गांधी यांनी भाजप बाहेरची वाट पकडली??; राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळले
- भाजपची ८१ जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातून गडकरी, गोयल, फडणवीस, चंद्रकांतदादा, विजया रहाटकर, मुंडे, तावडे