• Download App
    T20 वर्ल्ड कप मधली भारत - पाकिस्तान मॅच स्थगित करा; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी India vs Pak match in upcoming ICC T20 World Cup should be halted Pak get a message that if they keep supporting terrorism

    T20 वर्ल्ड कप मधली भारत – पाकिस्तान मॅच स्थगित करा; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी

    वृत्तसंस्था

    पाटणा : जम्मू-काश्मीरमध्ये ज्यापद्धतीने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तेथे गेलेल्या बाहेरच्या प्रदेशातील कामगारांची हत्या करत आहेत त्याचा निषेध म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी T 20 वर्ल्ड कप मधली भारत – पाकिस्तान मॅच भारतीय संघने खेळू नये. ती स्थगित करावी, अशी मागणी बिहारचे उपमुख्यमंत्री ताराकिशोर प्रसाद यांनी केली आहे.India vs Pak match in upcoming ICC T20 World Cup should be halted Pak get a message that if they keep supporting terrorism

    आतापर्यंत पाकिस्तानशी संबंध ठेवताना कठोर भूमिका घेण्याची मागणी शिवसेनेने महाराष्ट्रातून लावून धरली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्याआधी खेळपट्टी खणण्यापर्यंत शिवसैनिकांची मजल गेली होती. परंतु, आता महाराष्ट्राऐवजी बिहार मधून पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे.

    बिहार मधल्या दोन कामगारांची दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या परिसरात गोळ्या घालून हत्या केली होती. याविषयी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून कठोर उपाययोजना करण्याची मागणी केलीच आहे.

    या पार्श्‍वभूमीवर बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते ताराकिशोर प्रसाद यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना स्थगित करण्याची आग्रही मागणी केली आहे. पाकिस्तान बरोबर भारत कोणताही संपर्क प्रस्थापित करू इच्छित नाही, इशारा हा कठोर इशारा पाकिस्तानला भारताने आपल्या कृतीतून दिला पाहिजे, असे ते म्हणाले. पाकिस्तानला कोणत्याच प्रकारे आपल्याकडून पाठिंबा मिळता कामा नये अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली.

    India vs Pak match in upcoming ICC T20 World Cup should be halted Pak get a message that if they keep supporting terrorism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी