विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट येणार ही शक्यता वर्तवली जात असतानाच कोरोना बाधितांची संख्या मात्र सातत्याने कमी होताना दिसून येत आहे. आणि ही एक चांगली बातमी आहे. नुकताच भारताने कोरोना विरोधात लढाईमध्ये आणखी एक मोठं यश मिळवलं आहे. ते म्हणजे लसीकरणाच्या आकड्याने आज 99 कोटी डोसाचा टप्पा पूर्ण केला आहे. भारतात तब्बल 99 कोटी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया यांनी ट्विटरवरून दिली आहे.
India reaches 99 crore mark in corona vaccination, says Union Health Minister Mansukh Mandvia on Twitter
“आपण 99 कोटींवर आहोत आणि 100 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी भारताची विक्रमी वाटचाल सुरू आहे” असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.
गेल्या 24 तासांत देशभरामध्ये 87,41,160 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर दुसरीकडे देशातील कोरोना रुग्ण संख्याही कमी होताना दिसून येतेय. तर देशात गेल्या 24 तासांमध्ये 13,058 इतके रूग्ण नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या मागील 231 दिवसां मधील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
India reaches 99 crore mark in corona vaccination, says Union Health Minister Mansukh Mandvia on Twitter
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत घ्याव्यात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची सूचना
- आर्यन खानच्या मूलभूत हक्कांसाठी शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव
- कर्नाटक काँग्रेसने ट्वीटरवर पीएम मोदींना अंगठेबहाद्दर म्हटले, सोशल मीडियावर संताप पाहून ट्वीट केले डिलीट, सोशल मीडिया मॅनेजरवर ढकलला दोष
- भारतीय लष्कराला त्रिशूळ, वज्र हत्यारे; ड्रॅगनला अद्दल घडवणार; पौराणिक शस्त्रांचा आधार