विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणात भारताने संपूर्ण जगाला दिपविणारी कामगिरी केली आहे. जी-सात नावाने ओळखल्या जाणाऱ्या विकसित देशांनी सर्वांनी मिळून केलेल्य लसीकरणापेक्षा जास्त लसीकरण एकट्या भारताने केले आहे. जी-७ देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे १०.१ कोटी डोस ऑगस्ट महिन्यात दिले गेले. भारतामध्ये याच महिन्यात तब्बल १८ कोटी डोस देण्यात आले आहे.India, one of the world’s leading G7 nations in corona vaccination, G 7 gave 100 million doses in August, while India gave 180 million doses in a single month.
कोरोना विरुध्दच्या लढाईत लसीकरण हेच शस्त्र आहे हे ओळखून भारताने काम सुरू केले आहे. आत्तापर्यंत ६८ कोटी लसींचे डोस दिले गेले आहेत. कॅनडा, ब्रिटेन, इटली, जर्मनी, फ्रांस, अमेरिका आणि जापान या सात देशांनी एकूण दिलेल्या डोसपेक्षा भारताने जास्त डोस दिले आहेत.
ऑगस्ट महिन्यात जपानमध्ये सर्वाधिक ४ कोटी डोस दिले गेले. त्यानंतर अमेरिकेत २.३ कोटी, फ्रान्स १.३ कोटी, जमर्नी ९० लाख, इटली ८० लाख, ब्रिटन ५० लाख आणि कॅनडामध्ये ३० लाख डोस देण्यात आले.
भारतामध्ये ५० कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
३१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी १.४१ कोटी लसींचे डोस देण्यात आले होते. भारतामध्ये १६ जानेवारी रोजी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेची सुरूवात करण्यात आली.भारतामध्ये भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि रशियाची स्फुतनिक व्ही या तीन लसी दिल्या जात आहेत.
India, one of the world’s leading G7 nations in corona vaccination, G 7 gave 100 million doses in August, while India gave 180 million doses in a single month.
महत्त्वाच्या बातम्या
- South Africa Riots : दक्षिण आफ्रिकेत भारतवंशीयांकडून भयंकर हिंसाचार, डझनभर कृष्णवर्णीयांचा मृत्यू
- पवारांनी कुठे पाठीत खंजीर खुपसला दाखवा?, असे म्हणणाऱ्या संजय राऊतांना चंद्रकांतदादांचा “या” अभ्यासाचा सल्ला
- Bengal By-Poll : ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवणार, टीएमसीची घोषणा- ‘भाजपने उमेदवार उभे करून पैसे वाया घालवू नये’
- Farmers Protest : राकेश टिकैत यांच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांचा पलटवार, म्हणाले- सरकारने 11 वेळा चर्चा केली, काही जण भ्रम पसरवत आहेत