विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि इस्त्रायल यांच्यातील लष्कर संबंध आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया सध्या इस्रायल दौऱ्यावर असून, ते दोन्ही देशांच्या वायुदलांतील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी चर्चा करणार आहेत, अशी माहिती भारतीय वायुदलाने दिली आहे.India-Israel military ties to be strengthened, Discussion by Air Chief Marshal R K. S. Bhadauria
धोरणात्मक भागीदार असलेल्या भारत आणि इस्रायलचे बहुआयामी संबंध आहेत. संरक्षण सहकार्य आणि लष्करी पातळीवरील अदलाबदल हा या संबंधाचा महत्त्वाचा स्तंभ आहे, असे ट्विट भारतीय वायुदलाने केले. भारत व इस्रायलच्या वायुदलांतील द्विपक्षीय संबंधांची खोली व व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी दोन्ही वायुदलांचे प्रमुख चर्चा करतील, असे वायुदलाने या ट्विटमध्ये म्हटले आहे.
इस्रायली वायुदलाचे प्रमुख मेजर जनरल आमिकाम नॉर्किन यांचे निमंत्रण स्वीकारून एअर चीफ मार्शल भदौरिया हे मंगळवारी इस्रायलमध्ये दाखल झाले. यापूर्वी त्यांनी संयुक्त अरब अमिरातला भेट देऊन वायुदलप्रमुख मेजर जनरल इब्राहिम नासेर एम. अल् अलावी यांच्यासोबत चर्चा केली.
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वायुदलातील संबंध अधिक बळकट करण्याचे मार्ग आणि उपाययोजनांबाबत भदौरिया यांनी अलावी यांच्यासोबत रविवारी व्यापक चर्चा केली, अशी माहिती भारतीय वायुदलाने दिली.
India-Israel military ties to be strengthened, Discussion by Air Chief Marshal R K. S. Bhadauria
महत्त्वाच्या बातम्या
- Pegasus Spyware Case : सर्वोच्च न्यायालयाच्या लेखी पेगासस प्रकरण गंभीर, याचिकाकर्त्यांना त्यांच्या याचिकेची प्रत केंद्राला पाठवण्यास सांगितले
- पाकिस्तानात धर्मांधांचा पुन्हा उच्छाद : धर्मांधांनी गणपती मंदिराची केली तोडफोड, मूर्तीही केली ध्वस्त; व्हिडिओ व्हायरल होऊनही स्थानिक सरकारचे मौन
- आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTOला चकरा मारण्याची गरज नाही, NGO आणि ऑटो कंपनीदेखील देऊ शकणार परवाने
- कलम 370 पासून मुक्तीची दोन वर्षे : फुटीरतावादाची निघाली हवा, देशद्रोह्यांचा आवळला फास, दगडफेक करणारेही झाले गायब