• Download App
    भारत अमेरिकेच्या कच्छपी लागलाय??... वाचा रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लागारोव्ह यांचे परखड उत्तर!! |India is sovereign country, it knows national interests, asserts Russian foreign minister sergei lagarov

    भारत अमेरिकेच्या कच्छपी लागलाय??… वाचा रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लागारोव्ह यांचे परखड उत्तर!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर भारत अमेरिकेच्या कच्छपी लागला आहे, असा आरोप काही बुद्धीमंत राजकारणी करताना दिसत आहेत. परंतु या आरोपांना रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लागारोव्ह राव यांनी परस्पर परखड उत्तर दिले आहे.India is sovereign country, it knows national interests, asserts Russian foreign minister sergei lagarov

    अमेरिकेने भारतावर अनेकदा दबाव आणला. दक्षिण आशिया क्षेत्राचा विकास कसा व्हावा, यासाठी अमेरिकन दृष्टिकोन स्वीकारावा असा आग्रह धरला. परंतु, आमच्या भारतीय मित्रांनी त्यांना स्पष्ट सांगितले की भारत हा सार्वभौम देश आहे. भारताचे मित्र कोण असावेत, संरक्षण क्षेत्राबरोबरच बाकीच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि कोणाशी समजते करावेत,



    कोणत्या देशाकडून शस्त्रास्त्रे घ्यावीत हा अधिकार सर्वस्वी भारताचा आणि भारतीयांचा आहे. आमच्या सार्वभौमत्वाचे आम्ही तडजोड करणार नाही, असे आमच्या भारतीय मित्रांनी स्पष्टपणे सांगितले आहे, असे सर्गेई लागारोव्ह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

    भारत आणि रशिया यांच्यात आज संरक्षणविषयक समझोता झाला. त्यामध्ये एके 203 अत्याधुनिक रायफल्स भारतातील अमेठी मधील मोरवा कारखान्यात बनविण्यास मधली निर्णय झाला, याकडे सर्गेई लागारोव्ह यांनी आवर्जून लक्ष वेधले. भारत सार्वभौम देश आहे. स्वतःचे मित्र निवडण्याचा भारताला अधिकार आहे हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काहीच दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारवर भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री पातळ केल्याचा आरोप केला होता. भारत मोदी सरकारच्या अमेरिकेच्या कच्छपी लागून आपल्या परराष्ट्र धोरणाचे नुकसान करत आहे असेही ते म्हणाले होते. या पार्श्‍वभूमीवर रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी वर केलेले वक्तव्य आणि भारत सार्वभौम देश असल्याचा दिलेला निर्वाळा बरेच काही सांगून जात आहे.

    India is sovereign country, it knows national interests, asserts Russian foreign minister sergei lagarov

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!