विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबच्या वादाच्या दरम्यान, राज्यातील एका काँग्रेस आमदाराने दावा केला की काही स्त्रिया हिजाब घालत नाहीत म्हणून बलात्काराचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.India has the highest rate of rape as women do not wear hijab
हिजाब परिधान केल्यामुळे तरुण मुस्लिम विद्यार्थिनींच्या एका गटाला उडुपी येथील महाविद्यालयात प्रवेश दिला नाही. त्यानंतर कर्नाटकातील हिजाब वादाला तोंड फुटले. अनेक महाविद्यालये आणि शाळांनी तसाच आदेश जारी केल्याने ही समस्या राज्यभर पसरली.
आमदार जमीर अहमद म्हणाले “इस्लाममध्ये हिजाबचा अर्थ ‘परदा’ (बुरखा) आहे. तो मुली वयात आल्यावर त्यांचे सौंदर्य लपवण्यासाठी असतो. आज तुम्ही बघू शकता की, आपल्या देशात बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक आहे. याचे कारण काय आहे असे तुम्हाला वाटते? कारण अनेक महिला हिजाब घालत नाहीत,”
आपल्या तर्काच्या पुढे जाऊन, काँग्रेस आमदाराने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले, “पण, हिजाब घालणे अनिवार्य नाही, ज्यांना स्वतःचे संरक्षण करायचे आहे आणि ज्यांना प्रत्येकाला आपले सौंदर्य दाखवायचे नाही त्याच महिला तो घालतात. हे वर्षानुवर्षे प्रचलित आहे.”
महिलांच्या पोशाखामुळे पुरुष चुकीच्या मार्गाने जातात, अशा प्रकारची चुकीची टिप्पणी करणारे जमीर पहिलेच राजकीय नेता नाहीत. चार दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे राजकीय सचिव रेणुकाचार्य यांनी महिलांनी ‘पुरुषांना उत्तेजित करणारा आणि भडकावणारा’ पोशाख घालू नये, असे प्रतिगामी विधान केले होते. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.
यापूर्वी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, हिजाब इस्लामच्या प्रथेशी संबंधित नाही. काही महाविद्यालये आणि शाळांमध्ये मुस्लीम महिलांना हिजाब घालण्यास बंदी आहे. शीखांना पगडी घालण्याची मात्र परवानगी आहे हा युक्तिवादही निराधार असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले “शीख धर्मात, पगडीला धर्मासाठी आवश्यक मानले जाते आणि स्वीकारले जाते. दुसरीकडे, महिलांच्या पोशाखाच्या संदर्भात हिजाबचा कुराणमध्ये उल्लेख नाही. ”
India has the highest rate of rape as women do not wear hijab
महत्त्वाच्या बातम्या
- अंबानींसह जगातील टॉप 10 अब्जाधीशांपैकी 9 जणांना 132 अब्ज डॉलरचा फटका, एलन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांचे सर्वाधिक नुकसान
- BLACK DAY FOR INDIA : वतन से मुहब्बत कुछ ऐसे निभा गये – मुहब्बत के दिन उसपे जान लुटा गये ! पुलवामा हल्ला ३ वर्ष -कधीही न मिटणाऱ्या जखमा – UNKNOWN STORIES…
- सॅटेलाइट इंटरनेटसाठी जियोची एसईएसशी भागीदारी, स्वस्त ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न, मिळेल 100Gbps ची इंटरनेट स्पीड
- काँग्रेसने आंदोलनाचा आव आणला “सागर”वर; आंदोलक “बसले” जागेवर…!!