Monday, 5 May 2025
  • Download App
    आत्मनिर्भर भारत, हायपरलूप रेल्वे विकसित करण्याची क्षमता|India has ability to develop self-reliant Hyperloop Railway

    आत्मनिर्भर भारत, हायपरलूप रेल्वे विकसित करण्याची क्षमता

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारताकडे जलद प्रवासासाठी हायपरलूप रेल्वे विकसित करण्याची क्षमतो आहे. यासोबतच परदेशी कंपन्यांनाही हे तंत्रज्ञान भारतात आणण्याची परवानगी द्यायला हवी, असे मत नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. सारस्वत यांनी व्यक्त केले.India has ability to develop self-reliant Hyperloop

    भारतातही हायपरलूप तंत्रज्ञानाबाबत काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. सारस्वत म्हणाले, की हायपरलूप रेल्वे विकसित करण्यासाठी आपल्यासमोर दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे परदेशी कंपन्यांना त्यांचे तंत्रज्ञान आणण्याची परवानगी देणे. दुसरा पर्याय म्हणजे आपणच हे तंत्रज्ञान विकसित करणे.



    आपल्याकडे विकास आणि संशोधनाची क्षमता असून हायपरलूप तंत्रज्ञान विकसित करू शकतो. स्वदेशी तंत्रज्ञानाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे परदेशी कंपन्यांना परवानगी द्यायला हवी, असेही मत त्यांनी व्यक्त केले. हापरलूप तंत्रज्ञानामध्ये सुरक्षा आणि नियमन व्यवस्था महत्त्वाची आहे.

    यासंदर्भात तज्ज्ञांच्या समितीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.सेमीकंडक्टर चिपचा देशात प्रचंड तुटवडा आहे. या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत सरकार गांभिर्याने विचार करीत असल्याचे सारस्वत म्हणाले.

    India has ability to develop self-reliant Hyperloop Railway

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    बागलीहार + सलाल + किशनगंगा सगळ्या धरणांची गेट बंद; पाकिस्तानात चिनाब + झेलम नद्या पडल्या कोरड्या!!

    Jaishankar : युरोपकडून मदतीच्या प्रश्नावर परराष्ट्रमंत्र्यांचा निशाणा, जयशंकर म्हणाले- आम्हाला उपदेशकांची नव्हे तर सहयोगींची गरज

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!