• Download App
    India Fights Back : अमेरिकेतून 125,000 रेमडेसिव्हिर विमानाने भारतात दाखल, जर्मनीतूनही 4 ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकरची मदत । India Fights Back, amid Corona crisis US Sent 125000 remdesivir via plane in India, 4 oxygen tankers came from Germany

    India Fights Back : अमेरिकेतून १,२५००० रेमडेसिव्हिर कुप्या विमानाने भारतात दाखल, जर्मनीतूनही ४ ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकरची मदत

    India Fights Back : देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबरोबरच ऑक्सिजन तसेच इतर वैद्यकीय सामग्रीच्या कमतरतेमुळे हे संकट आणखी गहिरे झाले आहे. भारतात कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आहे. अशा या संकटाच्या काळात अनेक देशांनी भारताला मदत पाठवायला सुरुवात केली आहे. आता अमेरिकेकडून भारताला 125000 रेमडेसिव्हिरच्या कुप्या पाठवण्यात आल्या आहेत. India Fights Back, amid Corona crisis US Sent 125000 remdesivir via plane in India, 4 oxygen tankers came from Germany


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबरोबरच ऑक्सिजन तसेच इतर वैद्यकीय सामग्रीच्या कमतरतेमुळे हे संकट आणखी गहिरे झाले आहे. भारतात कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आहे. अशा या संकटाच्या काळात अनेक देशांनी भारताला मदत पाठवायला सुरुवात केली आहे. आता अमेरिकेकडून भारताला 125000 रेमडेसिव्हिरच्या कुप्या पाठवण्यात आल्या आहेत.

    सोमवारी दिल्ली विमानतळावर अमेरिकेकडून 1,25,000 रेमडेसिव्हिरच्या कुप्या घेऊन आलेले विमान उतरले. यामुळे देशात सुरू असलेला रेमडेसिव्हिरचा तुटवडा कमी होईल. दुसरीकडे, कोरोना महामारीच्या संकटात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी भारताच्या वायुसेनेने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

    भारतीय वायुसेनाच्या सी-17 एयरक्राफ्टने 4 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर जर्मनीहून एयरलिफ्ट करून हिंडन एअरबेसवर पोहोचवले. याशिवाय 450 ऑक्सिजन सिलिंडरही ब्रिटनहून एअरलिफ्ट करून चेन्नई एअरबेसवर पोहोचवण्यात आले. भारतीय वायुसेनेने या बाबीची माहिती दिली.

    India Fights Back, amid Corona crisis US Sent 125000 remdesivir via plane in India, 4 oxygen tankers came from Germany

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल