विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युक्रेनवरील रशियन आक्रमणाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन यूएस खासदारांच्या द्विपक्षीय गटाने भारताला केले आहे. युक्रेनमध्ये शांततेसाठी पुढाकार घेण्याच्या विनंतीसोबतच या खासदारांनी भारताने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विरोध करण्याची मागणीही केली. अमेरिकेचे खासदार जो विल्सन आणि भारतीय-अमेरिकन खासदार रो खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खासदारांनी अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्याशी चर्चा केली. India demands opposition to Russian President Vladimir Putin
संधू यांच्याशी झालेल्या चर्चेत विल्सन यांच्या सहभागाचे खन्ना यांनी कौतुक केले. युक्रेनमधील नागरिकांना लक्ष्य केल्याच्या विरोधात भारताने आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे,
दोन्ही पक्षांतील भारताचे मित्र त्याला शांततेसाठी आपला प्रभाव वापरण्यास उद्युक्त करत आहेत. खासदार विल्सन यांनी ट्विट केले की, ‘पुतिन यांनी युक्रेनमध्ये केलेल्या अत्याचाराचा जागतिक नेत्यांनी निषेध करणे महत्त्वाचे आहे.’
दोन दिवसांत ही दुसरी वेळ आहे जेव्हा अमेरिकन खासदारांनी युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्याबद्दल रशियाचा निषेध करण्याची विनंती भारताला केली आहे. एक दिवस अगोदर अमेरिकेचे दोन खासदार टेड डब्ल्यू लिऊ आणि टॉम मालिनॉस्की यांनी भारताला रशियाचा निषेध करण्याचे आवाहन केले होते. या खासदारांनी संधू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, आम्हाला भारताची रशियाशी असलेली मैत्री समजते, परंतु २ मार्च रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मतदानाच्या वेळी भारताच्या अनुपस्थितीमुळे आम्ही निराश आहोत.
रशियाकडील तेल खरेदीवर टीका करताना भारतीय-अमेरिकी काॅंग्रेसी अमीबेरा म्हणाले की, सर्वात वाईट गोष्ट म्हणजे भारत आता आंतरराष्ट्रीय निर्बंधांना बगल देऊन रशियाकडून कमी दराने तेल खरेदी करत आहे. रशियाची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय निर्बंधांनी ग्रासलेली असल्याने पुतिन यांना हे एक प्रकारचे जीवदान आहे.
युक्रेनवरील रशियन आक्रमणाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन यूएस खासदारांच्या द्विपक्षीय गटाने भारताला केले आहे. युक्रेनमध्ये शांततेसाठी पुढाकार घेण्याच्या विनंतीसोबतच या खासदारांनी भारताने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विरोध करण्याची मागणीही केली. अमेरिकन खासदार जो विल्सन आणि भारतीय-अमेरिकन खासदार रो खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खासदारांनी अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्याशी चर्चा केली.
संधू यांच्याशी झालेल्या चर्चेत विल्सन यांच्या सहभागाचे खन्ना यांनी कौतुक केले. युक्रेनमधील नागरिकांना लक्ष्य केल्याच्या विरोधात भारताने आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
India demands opposition to Russian President Vladimir Putin
महत्त्वाच्या बातम्या
- NAWAB MALIK : नवाब मलिक लवकरच देणार राजीनामा ? बिन खात्याने मंत्री ! साहेबांनी सर्व खाती घेतली काढून ; आता या नेत्यांवर जबाबदारी
- काश्मीर फाईल्स पाहिल्यावर भावुक झाली अभिनेत्री संदीपा धर, कुटुंबाला ट्रकच्या मागे लपून पळावे लागल्याची आठवण झाली ताजी
- महिलांचा दुर्गावतार, पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू