Independence Day : भारत आज 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताला जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. यानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनीही भारताला शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय संबंधांची त्यांनी प्रशंसा केली तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सामर्थ्याला सलामही केला आहे. Independence Day 2021 Russian President Vladimir Putin congratulated India
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आज 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताला जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. यानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनीही भारताला शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय संबंधांची त्यांनी प्रशंसा केली तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सामर्थ्याला सलामही केला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन म्हणाले की, भारताने आर्थिक, सामाजिक आणि इतर क्षेत्रात मिळवलेले यश सर्वमान्य आहे. भारत देश जागतिक क्षेत्रात उच्च प्रतिष्ठा प्राप्त करत असून आंतरराष्ट्रीय अजेंड्यावर समकालीन समस्यांचे निराकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
UNSCमध्ये पुतीन यांनी भारताचे कौतुक केले
अलीकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी UNSC अर्थात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत म्हटले की, मी या बैठकीच्या आयोजनात अशा उपयुक्त उपक्रमासाठी माझ्या भारतीय मित्रांचे आभार मानतो आणि या महिन्यात भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC)अध्यक्षांची कर्तव्ये यशस्वीपणे पूर्ण करणे सुरू ठेवावेत, अशी माझी इच्छा आहे.
अमेरिकेच्याही भारताला शुभेच्छा
भारताचे अभिनंदन करणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिकेचे नावही जोडले गेले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, ‘भारत आणि अमेरिकेने संपूर्ण जगाला दाखवून दिले पाहिजे की, दोन महान आणि वैविध्यपूर्ण लोकशाही देश सर्वत्र लोकांसाठी काम करू शकतात.’ ‘बायडेन पुढे म्हणाले की, मी आज भारत, अमेरिका आणि जगभर उत्सव साजरे करणाऱ्या सर्वांसाठी सुरक्षितता आणि समृद्धीसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाची कामना करतो.”
Independence Day 2021 Russian President Vladimir Putin congratulated India
महत्त्वाच्या बातम्या
- Lockdown In Maharashtra : ‘तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन’, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा
- ‘मुख्यमंत्री मरू द्या, माझ्या अजितदादांना आशीर्वाद द्या,’ शासकीय कार्यक्रमात मंत्री दत्तामामा भरणेंचे वादग्रस्त वक्तव्य
- हटके शेती : या वृक्षाची 120 रोपे लावा अन् 12 वर्षांत बना कोट्यधीश, जाणून घ्या याचे वैशिष्ट्य आणि का आहे ए़वढी डिमांड?
- ड्रॅगनच्या उचापती : ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत अमेरिकेला पछाडून चीन बनला नंबर वन, पण कसा? जाणून व्हाल हैराण!
- खुशखबर : आता सामान्य प्रवाशांनाही ट्रेनमध्ये मिळणार प्रत्येक सुविधा, रेल्वेमंत्र्यांनी आणली ‘ही’ योजना