भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसोबत 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया गुरुवारी मुंबईहून रवाना झाली आहे. बीसीसीआयने संघाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. IND vs SA: Team India leaves for South Africa; Virat Kohli OUT from BCCI photos …
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली. टीम इंडिया गुरुवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आहे. भारतीय संघाला 26 डिसेंबरपासून यजमानांसोबत 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या फ्लाइटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
BCCI ने 4 फोटो शेअर केले आहेत, ज्यात जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव दिसत आहेत, पण BCCI च्या या फोटोंमध्ये विराट कोहली दिसत नाहीये. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 39 कसोटी सामने खेळले गेले आहेत या 39 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने 15 सामने जिंकले असून भारताने 14 सामने जिंकले आहेत, तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.
IND vs SA: Team India leaves for South Africa; Virat Kohli OUT from BCCI photos …
महत्त्वाच्या बातम्या
- स्वर्णिम विजयाच्या दिवशी “तेजसला” आत्मनिर्भर भारताचा बूस्टर डोस; 2400 कोटींचे करार!!
- मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याच्या प्रस्तावाला मोदी मंत्रिमंडळाची मंजुरी, आता संसदेत मांडले जाणार विधेयक
- ताजमहालाच्या कारागिरांचे हात तोडले, तर काशी विश्वनाथ कॉरिडाॅरच्या कारागिरांवर पुष्प वर्षाव; कृषिमंत्र्यांकङून मोदींची प्रशंसा
- जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हिजबुलच्या दहशतवाद्याचा खातमा
- गुगल कंपनीने कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले बंधनकारक
- School Reopen : आज नागपूर तर सोमवारपासून औरंगाबादच्या शाळांची घंटा वाजणार ! कडक नियम-पालक मात्र संभ्रमात
- क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज