रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषकातील हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. दोन्ही देशांचे चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. चाहत्यांपासून ते दिग्गजांपर्यंत, प्रत्येकजण या सामन्यासाठी त्यांच्या संघांचा उत्साह वाढवण्यासाठी सक्रिय आहे. टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या टीमला तीन महत्त्वाचे सल्ला दिले आहेत. शोएबच्या मते, या सल्ल्यांचे पालन केल्याने पाकिस्तानचा विजय निश्चित होईल.IND Vs PAK T20 world cup shaoib akhtar hillarous advice to pak team to win the match
प्रतिनिधी
मुंबई : रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषकातील हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. दोन्ही देशांचे चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. चाहत्यांपासून ते दिग्गजांपर्यंत, प्रत्येकजण या सामन्यासाठी त्यांच्या संघांचा उत्साह वाढवण्यासाठी सक्रिय आहे.
टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या टीमला तीन महत्त्वाचे सल्ला दिले आहेत. शोएबच्या मते, या सल्ल्यांचे पालन केल्याने पाकिस्तानचा विजय निश्चित होईल.
टी -20 विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भारतासमोर विजयासाठी संघर्ष करताना दिसला आहे. या स्पर्धेच्या सहा हंगामात आतापर्यंत दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी टीम इंडियाला विजय मिळाला आहे. त्याचवेळी दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 8 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानने केवळ एकच सामना जिंकला आहे. रविवारी पाकिस्तान या पराभवाची मालिका संपवण्यासाठी मैदानात उतरेल.
शोएब अख्तरचा टीमला सल्ला
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या टीमला हा सामना जिंकण्यासाठी असे तीन सल्ले दिले आहेत, जे पाहून तुम्हीही तुमचे हास्य रोखू शकणार नाही. शोएब अख्तरने सल्ला देताना म्हटले की, ‘पाकिस्तानने टीम इंडियाच्या खेळाडूंना झोपेची गोळी द्यावी, कारण ती खूप मजबूत टीम आहे. माझा दुसरा सल्ला असा आहे की,
तुम्ही लोक विराट कोहलीला इन्स्टाग्राम वापरण्यापासून थांबवा, कारण तो तिथे खूप लोकप्रिय आहे. महेंद्रसिंग धोनीबाबत तो म्हणाला, ‘पाकिस्तानी खेळाडू फक्त हे लक्षात ठेवा की धोनी स्वतः मैदानावर फलंदाजीसाठी येऊ नये, कारण माझ्यावर विश्वास ठेवा की तो आजही या सर्व फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे.’
IND Vs PAK T20 world cup shaoib akhtar hillarous advice to pak team to win the match
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरवरून किरीन रिजिजुंचे संकेत , म्हणाले – जे करायचय ते वेळेवर करू
- ड्रॅगनची पुन्हा कुरापत : चीनचा नेपाळच्या हुमला जिल्ह्यावर ताबा, संपूर्ण परिसराला कुंपण घालून स्थानिकांनाही येण्यापासून रोखले
- औरंगाबाद: हीच ‘शिवशाही’ का? मुख्यमंत्री आले- न्यायालयाचं उद्घाटन केलं-अन्यायावर मात्र मौन!दरोडा-बलात्कार प्रकरणाची साधी दखलही नाही…
- निजामशाहीची पालखी वाहण्यात मोठा आनंद; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका