• Download App
    कोरोना रुग्णासाठी ऑक्सिजनचा वापर वाढतोय, उत्तर प्रदेशातील चित्र ; 29 हजार जणांना कोरोना।Increasing oxygen consumption for corona patients

    कोरोना रुग्णासाठी ऑक्सिजनचा वापर वाढतोय, उत्तर प्रदेशातील चित्र ; 29 हजार जणांना कोरोना

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांसाठी ऑक्सिजन वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. पूर्वी 30 टँकर लागत होते. आता 84 ऑक्सिजन टँकर लागत आहेत. त्या शिवाय पुरवठ्यासाठी रेल्वे आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे.  Increasing oxygen consumption for corona patients

    उत्तर प्रदेशात 24 तासांत 29 हजार 824 नवे रुग्ण आढळले असून 35 हजार 903 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. 266 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात लसीकरण वेगात सुरु आहे. 99 लाख लोकांना पहिला लसीचा डोस दिला असून 21 लाख लोकांना दुसरा डोस दिला जाणार आहे.



    आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह म्हणाले, राज्यात ऑक्सिजन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचे प्रमाण 30 ते 35 टक्के आहे.पंतप्रधान मोदी यांनी ऑक्सिजन पर्याप्त पुरविला आहे. 751 टन ऑक्सिजन पुरविण्यात येत आहे. तो जसा जसा येईल तसा तो राज्यात विविध ठिकाणी पुरविला जाईल. ऑक्सिजन टँकर पूर्वी 30 लागत होते . आता ही संख्या 84 एवढी झाली. त्याशिवाय ऑक्सिजन एक्स्प्रेस, हवाई दलाकडून तो आणला जात आहे.

    Increasing oxygen consumption for corona patients

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही