• Download App
    घरीच कोरोना चाचण्या करण्याचे वाढले प्रमाण, गेल्या २० दिवसांत घरीच केल्या दोन लाख जणांनी कोविड चाचणी|Increased rate of corona testing at home, covid test done by two lakh people at home in last 20 days

    घरीच कोरोना चाचण्या करण्याचे वाढले प्रमाण, गेल्या २० दिवसांत घरीच केल्या दोन लाख जणांनी कोविड चाचणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कोविड टेस्ट किटच्या सहाय्याने घरीच कोरोनाची चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या २० दिवसांत दोन लाख नागरिकांनी घरीच कोविड-19 साठी चाचणी करून घेतली आहे. गेल्या वर्षी केवळ तीन हजार जणांनी घरी चाचणी केली होती अशी माहिती केंद्रीय आरोग्यविभागाने दिलीआहे.Increased rate of corona testing at home, covid test done by two lakh people at home in last 20 days

    आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव म्हणाले की, देशातील एकूण चाचण्यांचे प्रमाण गेल्या वर्षी इतकेच आहे. आरटी-पीसीआर, अ‍ॅँटीजेन आणि किंवा घरगुती प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. आरएनए एक्सट्रॅक्शन किट्स सारख्या सहायक उपकरणांचा वापर वाढला आहे.



    गेल्या संपूर्ण वर्षात फक्त 3,000 घरगुती चाचण्या नोंदवल्या गेल्या. या 20 दिवसात दोन लाख घरगुती चाचण्या झाल्या आहेत. मात्र, काही जिल्हे आणि राज्यांत चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. त्यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

    भार्गव म्हणाले, डिसेंबरमध्ये 16 हजार जीनोम सिक्वेंन्सिंग करण्यात आले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जीनोम सिक्वेन्सिंग महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला डेल्टा किंवा ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की नाही हे जाणून घेऊन फारसा उपयोग होत नाही. याचे कारण म्हणजे चाचण्यांची पध्दत आणि उपचार सारखेच असतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जिनोम सिक्वेन्सिंग महत्वाचे आहे.

    ते म्हणाले, जेव्हा ओमिक्रॉनला झाली तेव्हा सर्वात महत्वाचा टप्पा होता की प्रवासी येत असताना त्यांची तपासणी करणे महत्वाचे होते. ज्यांना ओमिक्रॉन किंवा डेल्टा ची लागण झाली आहे त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे.

    Increased rate of corona testing at home, covid test done by two lakh people at home in last 20 days

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!