वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेल्या पाचही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. Increase vaccination in all 5 states
मणिपूरमध्ये पहिल्या कोरोनाप्रतिबंधक लसीचे प्रमाण कमी असल्याबद्दल आयोगाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आयोगाने याआधीही अशाच प्रकारचे निर्देश राज्यांना दिले होते. दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने बायोमेट्रिक उपस्थितीला ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
दिव्यांग आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती नसेल, त्यांना घरून देखील काम करता येईल. विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशीलचंद्रा म्हणाले की, ‘‘ उत्तरप्रदेशातील ८६ टक्के लोकांना पहिला डोस मिळाला असून ४९ टक्के जणांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये सर्व पात्र लोकांना लस देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून आम्ही आग्रही आहोत.’’
Increase vaccination in all 5 states
महत्त्वाच्या बातम्या
- BJP MAYOR : चंदीगढ महानगरपालिकेत भाजपचा महापौर-रणनिती मात्र महाराष्ट्राची ! काय आहे चंदिगढचं महाराष्ट्र कनेक्शन…
- सांगलीत पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार : शर्यतीच्या बैल गाड्यांच्या मागणीत मोठी वाढ
- बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू; लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर दुर्घटना आठ जण जखमी
- बॅडमिंटनपटू काश्मीरा भंडारीचा पुण्यात अपघाती मृत्यू