विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला असून आता पीएफच्या व्याजावर प्राप्तीकर भरावा लागणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने ईपीएफमध्ये एका आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले असेल, तर त्याला 2021-22 या आर्थिक वषार्पासून दोन स्वतंत्र पीएफ खाती ठेवावी लागतील.Income tax on PF interest, employees will now have to keep two separate PF accounts
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.विद्यमान भविष्य निधी खाते दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील. पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावरील कराची गणना करण्यासाठी स्वतंत्र पीएफ खाते उघडले जाईल.
सीबीडीटीच्या अधिसूचनेनुसार, 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही योगदानावर कोणताही कर भरावा लागणार नाही, परंतु 2020-21 आर्थिक वषार्नंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल, ज्याची स्वतंत्र गणना केली जाणार आहे.
हे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जर तुमच्या पीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असेल, तर तुम्हाला त्या अतिरिक्त रकमेवर मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागेल. ही माहिती तुम्हाला पुढील वर्षीच्या आयकर विवरणपत्र भरतानाही सांगावी लागेल. जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात नियोक्त्याचे योगदान नसेल तर त्याच्यासाठी ही मयार्दा 5 लाख रुपये असेल.
दरवर्षी अडीच लाख रुपयांची ही मर्यादा फक्त खासगी कंपन्यांमध्ये काम करणाºया कर्मचाºयांसाठी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योगदानाची मर्यादा 2.5 लाखांऐवजी 5 लाख रुपये आहे. सरकारी कर्मचाºयाच्या ईपीएफ आणि व्हीपीएफ खात्यात वार्षिक पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली गेली तर त्यांना त्या अतिरिक्त रकमेवर कर भरावा लागेल.
Income tax on PF interest, employees will now have to keep two separate PF accounts
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे मृत्यूवर भरपाईचे धोरण नसल्याने केंद्राला फटकारले, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- ‘तुम्ही काही करेपर्यंत तिसरी लाटही निघून जाईल’
- न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला : इसिसच्या जिहादीने 6 जणांना चाकूने भोसकले, 3 जण गंभीर; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार
- काबूलमध्ये ‘तालिबान सरकार’ स्थापनेचे होर्डिंग्ज, हक्कानी नेटवर्कलाही सत्तेत स्थान, मुल्ला बरादर करणार नेतृत्व