विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रिअल इस्टेट आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील एका कंपनीवर छापा टाकून आयकर विभागाने तब्बल ३०० कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आणला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार ६ जुलै रोजी हा छापा टाकला होता.Income tax department raids Hyderabad-based company, reveals Rs 300 crore black money
केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार छडती आणि जप्ती मोहीम आणि कागदपत्रांच्या छाननीनंतर या कंपनीकडे ३०० कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे आढळून आले आहे. या पैशाच्या स्त्रोत्राबाबत कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आली नाही. त्यामुळे कंपनीने आता कर भरण्याची तयारी दर्शविली आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने या कंपनीचे नाव उघड केलेले नाही. मात्र, रिअल इस्टेट क्षेत्रातील ही कंपनी हैद्राबाद येथील आहे. कंपनीचे कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प संपूर्ण देशात आहेत. मात्र, रिअल इस्टेट क्षेत्रात केवळ हैद्राबाद येथे कार्यालय आहे.
आयकर विभागाच्या चौकशीत दिसून आले की कंपनीने २०१८-१९ मध्ये आपली बहुतांश हिस्सेदारी सिंगापूर येथील एका अनिवासी भारतीय कंपनीला विकली होती.
त्यातून मोठ्या प्रमाणावर भांडवलाची उभारणी केली होती. कंपनीने शेअर खरेदी, विक्री यातून कमाविलेला नफा तोटा दाखविला. यातून सुमारे बाराशे कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे कंपनीने दाखविले.
Income tax department raids Hyderabad-based company, reveals Rs 300 crore black money
महत्त्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथच पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, आइएएनएस-सीवोटरच्या सर्व्हेत ५२ टक्के लोकांनी विश्वास केला व्यक्त
- केंद्राने सहकार मंत्रालय काढले, राष्ट्रवादीला फारच टोचले; अजितदादांनी हेतूंविषयी सवाल विचारले…!!
- ममता बॅनर्जींनी लोकशाही संकेतांनाच धुडकावले, लोकलेखा समितीवर आपल्याच पक्षाचे मुकूल रॉय यांना केले अध्यक्ष
- महाराष्ट्राच्या नावावर नकोसा विक्रम, राज्यात कोरोना मृत्यूंनी ओलांडला सव्वा लाखाचा टप्पा, 24 तासांत आढळले 8,992 रुग्ण