• Download App
    द्रमुक नेते स्टालिन यांच्या जावयाच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाची धाड, मोठी रोकड लपवल्याचा संशय, तामिळनाडूत 6 एप्रिलला मतदान । Income Tax department Raid on Sabareesan, son-in-law of DMK president MK Stalin

    द्रमुक नेते स्टालिन यांच्या जावयाच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी, मोठी रोकड लपवल्याचा संशय

    Income Tax Department Raid : तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाने द्रमुक नेत्याच्या नातेवाइकाच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्राप्तिकर विभागाच्या पथकाने डीएमके प्रमुख एमके स्टालिन यांचे जावई सबेरिसिन यांचे घर, फॉर्म हाऊससह इतर ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. मात्र, अद्याप कारवाईबाबत निश्चित माहिती समोर आली नाही. स्टालिन यांच्या जावयाच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. Income Tax department Raid on Sabareesan, son-in-law of DMK president MK Stalin


    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाने द्रमुक नेत्याच्या नातेवाइकाच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्राप्तिकर विभागाच्या पथकाने डीएमके प्रमुख एमके स्टालिन यांचे जावई सबेरिसिन यांचे घर, फॉर्म हाऊससह इतर ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. मात्र, अद्याप कारवाईबाबत निश्चित माहिती समोर आली नाही. स्टालिन यांच्या जावयाच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

    ए. राजा यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

    दरम्यान, 6 एप्रिल रोजी तामिळनाडूमधील 234 जागांसाठी मतदान होणार आहे. 2 मे रोजी मतमोजणी होईल. त्याआधी, द्रमुक नेते ए. राजा यांच्यावर कारवाई करत निवडणूक आयोगाने त्यांना पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. तसेच दोन दिवस प्रचारावर बंदी घातली आहे. ए. राजांवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि त्यांच्या आईवर अर्वाच्या भाषेत टीका केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

    उदयनिधींनी लावला जावईशोध

    दुसरीकडे, एमके स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. दिवंगत सुषमा स्वराज व अरुण जेटली यांचे मृत्यू पंतप्रधान मोदींच्या छळामुळे झाल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अरुण जेटली व सुषमा स्वराज यांच्या कन्यांनी उदयनिधी यांना खडे बोल सुनावले आहेत. राजकीय मुद्द्यांवर निवडणूक लढण्याऐवजी दिवंगत व्यक्तींच्या स्मृतींचा अपमान करत असल्याची भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे.

    Income Tax department Raid on Sabareesan, son-in-law of DMK president MK Stalin

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र