वृत्तसंस्था
गांधीनगर : केवळ भारतीय कंपन्या आणि मेड इन इंडिया संरक्षण उत्पादने यांचे डिफेन्स एक्स्पो प्रदर्शन गांधीनगर मधील महात्मा मंदिर परिसरात सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या डिफेन्स एक्स्पो 2022 चे उद्घाटन झाले. Inauguration of Defense Expo of only Indian companies and Made in India defense products at Mahatma Mandir area of Gandhinagar
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशवासीय आत्मनिर्भर भारताच्या दिशेने दमदार पावले टाकत असताना केवळ भारतीय कंपन्या आणि भारतात बनलेली संरक्षण उत्पादने यांचे हे एक्सक्लुसिव्ह डिफेन्स एक्सपो प्रदर्शन आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्र भारत परावलंबी राहिल्याने मोठे नुकसान झाले. भारताच्या संरक्षण करता गरजा पुरवताना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडला.
क्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन उत्पादनांवर अवलंबून राहणे देखील अवघड झाले. भारताची आता आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू असताना भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन देऊन संरक्षण उत्पादने वाढवणे, त्यांची गुणवत्ता अधिकाधिक विकसित करणे आणि भारतीय कंपन्यांना संरक्षण उत्पादने निर्यातीचे प्रोत्साहन देणे या हेतूने पहिल्यांदा हे भारत केंद्रित डिफेन्स एक्सपो प्रदर्शन संरक्षण मंत्रालयाने आयोजित केले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर मधील महात्मा मंदिर परिसरात हे प्रदर्शन होत आहे.
या डिफेन्स एक्सपो प्रदर्शनाच्या निमित्ताने डीसा हवाई केंद्राचे भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले.
युक्रेन युद्धाचा धडा
भारताच्या संरक्षणासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणे भारताला परवडणारे नाही आपल्याला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावेच लागेल. युक्रेन युद्धाने आपल्याला यातून चांगला धडा घालून दिला आहे. सर्वच बाजूंनी भारताने सम्यक विचार करून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे, ते तसेच पुढे चालू ठेवण्याचा इरादा आहे, असे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे स्वतंत्र संचालक दीपक शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
Inauguration of Defense Expo of only Indian companies and Made in India defense products at Mahatma Mandir area of Gandhinagar
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्रासाठी रेल्वे विकासाचे हायस्पीड निर्णय; कोणते ते वाचा!
- दाऊद – हाफिज सईदला भारताच्या ताब्यात कधी देणार? पाकिस्तानी अधिकाऱ्याची बोलती बंद प्रतिनिधी
- पीएफआयच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन पाकिस्तानी, सिमीच्या धर्तीवर काम; एटीएसच्या चौकशीत माहिती उघड
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??