Wednesday, 7 May 2025
  • Download App
    उत्तर प्रदेशात बिगर यादव ओबीसी कळीचा मुद्दा, भाजपा ओबीसी मोर्चा उतरणार रस्त्यावर|In Uttar Pradesh, the issue of non-Yadav OBC key, BJP OBC Morcha will take to the streets

    उत्तर प्रदेशात बिगर यादव ओबीसी कळीचा मुद्दा, भाजपा ओबीसी मोर्चा उतरणार रस्त्यावर

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर बिगर यादव ओबीसी नेते भारतीय जनता पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे बिगर यादव ओबीसींचा पाठिंबा कळीचा मुद्दा बनला आहे. यासाठी आता भाजपचा ओबीसी मोर्चा रस्त्यावर उतरणार आहे.In Uttar Pradesh, the issue of non-Yadav OBC key, BJP OBC Morcha will take to the streets

    स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासह दोन मंत्री आणि बारा आमदार भाजपमधून बाहेर पडले आहेत. योगी आदित्यनाथ सरकार ओबीसींविरुध्द असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, ओबीसींच्या कल्याणापेक्षा या नेत्यांचे स्वार्थी हेतूच पक्षांतरामागे आहेत.



    भाजपने ओबीसींच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत, हे पटवून देण्यासाठी आता ओबीसी मोर्चा रस्त्यावर उतरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्यार् कल्याणकारी उपायांची मतदारांना माहिती देण्यासाठी ओबीसी मोर्चा घरोघरी आणि रस्त्याच्या कडेला बैठका आयोजित करण्याचे काम देण्यात आले आहे. ओबीसी मोचार्चे प्रमुख के. लक्ष्मण हे राज्याचा दौरा सुरू करणार आहेत.

    लक्ष्मण यांनी सांगितले की, भाजप सोडलेल्या आमदारांनी ओबीसींच्या हितासाठी नव्हे तर स्वार्थासाठी पक्ष सोडला आहे, हे आम्ही घरोघरी जाऊन मतदारांना पटवून देऊ. त्यांच्यावर अन्याय होत होता तर त्यांनी पक्ष सोडण्यासाठी निवडणुकीची वाट का पाहिली असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करत ओबीसी मोर्चा सर्व मतदारसंघात कोपरा सभा घेणार आहे.

    घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेणार आहे. किसान सन्मान योजनेपासून ते पंतप्रधान आवास योजनेतून गरीबांसाठी देण्यात आलेली घरे, एक कोटी मोबाईल फोनचे वितरण याची माहिती मतदारांना देण्यात येईल. ओबीसी बहुल मतदारसंघात छोट्या सभा आयोजित करण्यात येतील.

    मोदी आणि योगी सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा प्रत्येक घराला आणि प्रत्येक व्यक्तीला लाभ झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व कल्याणकारी उपायांची माहिती असलेली पुस्तिका तयार केली आहेत.

    कार्यकर्त्यांचे पथक घरोघरी जाऊन मतदारांना ते समजावून सांगेल.उत्तर प्रदेशात ओबीसी लोकसंख्या सुमारे 40-50 टक्के आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किमान ३५ टक्के गैर यादव ओबीसी आहेत.

    आमच्यासाठी ओबीसी मत हे खूप महत्त्वाचे आहे. विरोधकांकडून केल्या जात असलेल्या अपप्रचाराला मतदार बळी पडणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ. त्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची रणनिती भाजपने आखली आहे.

    In Uttar Pradesh, the issue of non-Yadav OBC key, BJP OBC Morcha will take to the streets

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील कोणती 9 ठिकाणे उद्ध्वस्त केली?

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- भारतात आरक्षण रेल्वेच्या डब्यासारखे; आत असलेल्यांना वाटते इतरांनी आत येऊ नये

    PM Modi : पाकिस्तानवर एअर स्ट्राइकपूर्वी PM म्हणाले होते- भारताचे पाणी भारतासाठी वाहणार