• Download App
    उत्तर प्रदेशात कायद्याचा बडगा चालविला; गुंड माफियांची 1800 कोटींची मालमत्ता जप्त; अतिक्रमणे उध्वस्त|In Uttar Pradesh; Rs 1,800 crore worth of assets seized by goons; Destroy the encroachments

    उत्तर प्रदेशात कायद्याचा बडगा चालविला; गुंड माफियांची 1800 कोटींची मालमत्ता जप्त; अतिक्रमणे उध्वस्त

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशात गेल्या साडेचार वर्षांमध्ये गुंड – माफियांची पाच दहा कोटींची नव्हे, तर तब्बल 1800 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यांनी केलेले अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले आहे. कायद्याचा जबरदस्त बडगा त्यांच्यावर चालविण्यात आला आहे.In Uttar Pradesh; Rs 1,800 crore worth of assets seized by goons; Destroy the encroachments

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या साडेचार वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेताना ही माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशात गुंड – माफियांची जात-धर्म काहीही न बघता त्यांच्यावर कठोर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी बळकावलेल्या जमिनी सोडवून सरकारच्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.



    त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोक्याच्या जागांवर केलेली अतिक्रमणे बांधकामे कोर्टाच्या आदेशानुसार बुलडोझर लावून उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. राज्य सरकारने गुंड माफिया यांची जात, धर्म काहीही बघितलेला नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

    राज्यातील गुंड माफिया यांची तब्बल 1800 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे तसेच अतिक्रमित सर्व बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. गुंड माफिया यांच्याविरोधातील कारवाई कायद्यानुसार सुरूच राहील. त्यात खंड पडणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

    अतिक अहमद, मुख्तार अन्सारी, मोहम्मद रफीक शेख, आता उर रहमान, बाबू नाला, मुकेश पांडे, भूपेश नेपाली यांच्यासह 50 पेक्षा अधिक गुंडांच्या आणि माफियांच्या मालमत्ता उध्वस्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमणे करून स्वतःचे महाल उभे केले होते. पूर्वांचलात हे अतिक्रमण अधिक प्रमाणात होते. ते बुलडोझर लावून उद्ध्वस्त करण्यात आले आहे, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.

    40 पेक्षा अधिक वॉन्टेड गुन्हेगारांवर बक्षिसे लावून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. त्यांच्या साथीदारांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात गुंड – माफियांचे नाही तर कायद्याचे राज्य चालेल हे आम्ही गेल्या साडेचार वर्षात दाखवून दिले आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

    In Uttar Pradesh; Rs 1,800 crore worth of assets seized by goons; Destroy the encroachments

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Donald Trump : थायलंडसोबतचा सीमासंघर्ष थांबवल्याबद्दल कंबोडियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस; पाकिस्ताननंतर कंबोडियाचा दुसरा पाठिंबा

    Vice President : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 9 सप्टेंबरला; 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार

    Kangana Ranaut : कंगना यांना हायकोर्टाचा दिलासा नाही; मानहानी खटला रद्द करण्यास नकार; महिला शेतकऱ्याला 100 रुपयांसाठी आंदोलन करणारी म्हटले होते