• Download App
    उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे जातीचे कार्ड, सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीहिाय जनगणना करण्याचे आश्वासन|In Uttar Pradesh, Akhilesh Yadav's caste card promises to conduct a caste-wise census in three months if he comes to power

    उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे जातीचे कार्ड, सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीहिाय जनगणना करण्याचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशात आता समाजवादी पार्टीने जातीचे कार्ड खेळण्याचे ठरविले आहे. आम्ही सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीनिहाय जनगणना करू असे आश्वासन समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिले आहे.In Uttar Pradesh, Akhilesh Yadav’s caste card promises to conduct a caste-wise census in three months if he comes to power

    उत्तर प्रदेश सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्री पदाचा राजीनामा देणारे दारा सिंह चौहान आणि भाजपाचे सहयोगी अपना दलचे (सोनेलाल) आमदार डॉ. आरके वर्मा यांनी रविवारी त्यांच्या समर्थकांसह समाजवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना अखिलेश यादव यांनी जातीनिहाय जनगणनेचे आश्वासन दिले.



    सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. उत्तर प्रदेशातील अनेक ओबीसी घटक यामुळे नाराज आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी महाराष्ट्र सरकारला ओबीसींचा इप्लेरिकल डाटा मागितला आहे. उत्तर प्रदेशातही हे करावे लागणार आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांनी हे आश्वासन दिले आहे.

    समाजवादी पाटीर्चे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले, कधी कधी ते म्हणायचे की ते अयोध्येतून लढतील, मथुरेतून लढतील, प्रयागराजमधून लढतील. पण भाजपाने निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्यांना आधीच गोरखपूरला पाठवलं, हे मला आवडलं. आता योगींनी तिथेच राहावे, तिथून येण्याची गरज नाही.

    In Uttar Pradesh, Akhilesh Yadav’s caste card promises to conduct a caste-wise census in three months if he comes to power

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार