• Download App
    योगी मंत्रिमंडळात ब्रजेश पाठक उपमुख्यमंत्री, स्वतंत्र देव सिंग मंत्री; डॉ. दिनेश शर्मांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी??In the Yogi Cabinet, Brajesh Pathak is the Deputy Chief Minister and Swatantra Dev Singh is the Minister

    Yogi Adityanath : योगी मंत्रिमंडळात ब्रजेश पाठक उपमुख्यमंत्री, स्वतंत्र देव सिंग मंत्री; डॉ. दिनेश शर्मांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी??

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन विक्रम रचणारे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळात अतिशय महत्त्वपूर्ण बदल करत ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्रीपदी बढती दिली आहे, तसेच भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांना मंत्री पदी नियुक्त करून त्यांची प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी वेगळ्या व्यक्तीकडे सोपवण्याची सूज सूतोवाच केले आहे.In the Yogi Cabinet, Brajesh Pathak is the Deputy Chief Minister and Swatantra Dev Singh is the Minister

    पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सर्व मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपच्या अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आहे.

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातला सर्वात मोठा बदल केला असून विद्यमान उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यांच्या ऐवजी ब्रजेश पाठक यांच्याकडे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डॉ. दिनेश शर्मा हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. परंतु त्यांना मंत्रिमंडळात स्थान न देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.

    त्याच वेळी पहिले उपमुख्यमंत्री म्हणून केशव प्रसाद मौर्य यांना कायम ठेवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत मथुरा मतदारसंघातून केशव प्रसाद मौर्य यांना पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांचे स्थान उपमुख्यमंत्री म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.

    – जितीन प्रसाद यांना बक्षिसी

    याखेरीज सुरेश खन्ना या वरिष्ठ मंत्र्यांना देखील मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आले आहे. काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले जितीन प्रसाद यांना कॅबिनेट मंत्री पदी शपथ देण्यात आली आहे. ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत.

    लखनऊच्या अटल स्टेडियम मध्ये भव्य समारंभात योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. सहयोगी पक्षांमधले विनय राजभर आणि डॉ. संजय निषाद यांना मंत्रिमंडळात पहिल्या सूचित स्थान देण्यात आले आहे. या सर्व मंत्र्यांना राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शपथ दिली आहे.

    In the Yogi Cabinet, Brajesh Pathak is the Deputy Chief Minister and Swatantra Dev Singh is the Minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही