उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सक्रीय झाल्या आ हेत. गाझियाबाद येथील पहिल्याच सभेत त्या समावादी पार्टी आणि काॅंग्रेवर बरसल्या. दलितविरोधी धोरणांमुळे काॅंग्रेसला केंद्रातून तसेच उत्तर प्रदेशमधून हद्दपार करण्यात आले. समाजवादी पार्टीने दंगली घडवित गुन्हेगारांना प्राेत्साहन दिले असा आराेप त्यांनी केला.In the very first rally, Mayawati criticized the Samajwadi Party, Congress and BJP
विशेष प्रतिनिधी
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सक्रीय झाल्या आहेत. गाझियाबाद येथील पहिल्याच सभेत त्या समावादी पार्टी अाणि काॅंग्रेवर बरसल्या. दलितविरोधी धोरणांमुळे काॅंग्रेसला केंद्रातून तसेच उत्तर प्रदेशमधून हद्दपार करण्यात आले. समाजवादी पार्टीने दंगली घडवित गुन्हेगारांना प्राेत्साहन दिले असा आराेप त्यांनी केला.
गाझियाबादमधील कवी नगर रामलीला मैदानावर रॅलीला संबोधित करताना मायावती म्हणाल्या, दलितविरोधी धोरणांमुळे काॅंग्रेसला केंद्रातून तसेच उत्तर प्रदेशमधून हद्दपार करण्यात आले. काँग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतरत्न’ बहाल केला नाही. बसपचे संस्थापक माननीय कांशीराम यांच्या निधनावर त्यांनी कधीही एक दिवसाचा शोकही जाहीर केला नाही.
समाजवादी पक्षावर हल्लाबाेल करताना मायावती म्हणाल्या, सपा राजवटीत झालेली विकासकामे विशिष्ट प्रदेश आणि विशिष्ट वर्गापुरती मर्यादित राहिली. दलित आणि ओबीसींना सावत्र आईची वागणूक मिळाली. समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यावर त्यांनी सरकारी कार्यालयातील एससी/एसटी आरक्षण रद्द केले. एससी/एसटी कर्मचाऱ्यांची चुकीच्या पद्धतीने पदावनती करण्यात आली होती. दलित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही रोखून धरण्यात आली होती. सरकारी जमीन वाटपामध्ये अनुसूचित जाती/जमाती समुदायाच्या सदस्यांना दिले जाणारे प्राधान्य देखील रद्द करण्यात आले. दुर्बल घटकांसाठी ही त्यांची विचार प्रक्रिया आहे.
भाजपवर टीका करताना मायावती म्हणाल्या, धर्माच्या नावाखाली त्यांनी द्वेषाचे वातावरण निर्माण केले आहे. गुन्ह्यांच्या घटनाही वाढल्या असून दलित महिलांना याचा फटका बसला आहे. भाजप सरकारच्या काळात दलित आणि मागासवर्गीयांना आरक्षणाचा पुरेपूर लाभ मिळू शकलेला नाही, कारण सरकारने बहुतांश कामे खासगी क्षेत्राला दिली आहेत, जिथे नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद नाही. मुस्लिम आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांना भेदभावाचा सामना करावा लागला आहे आणि यावेळी सवर्णांनाही उपेक्षित वाटत आहे. आम्ही सत्तेवर आल्यास विविध विभागातील, विशेषतः शिक्षण विभागातील आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची चौकशी करण्यासाठी आम्ही एक आयोग स्थापन करू.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत, बहुजन समाज पक्षाने सर्व 403 जागा लढवल्या पण फक्त 19 जागा जिंकू शकल्या. मात्र त्यांना 22.23% मते मिळवली हाेती. भाजपच्या 39.67% च्या मतांनंतर ती दुसऱ्या क्रमांकाची हाेती.