Congress leader Digvijay Singh : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी कुमार विश्वास यांना समर्थन दिले आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्याकडे खलिस्तान चळवळीविरोधात निवेदन देण्याची मागणी केली आहे. In support of Kumar Vishwas, Congress leader Digvijay Singh said that Kejriwal should make a statement against Khalistan supporters
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी कुमार विश्वास यांना समर्थन दिले आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्याकडे खलिस्तान चळवळीविरोधात निवेदन देण्याची मागणी केली आहे.
कुमार विश्वास यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केजरीवाल यांच्यावर फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. केजरीवाल यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. कुमार विश्वास यांनी दावा केला होता की, अरविंद केजरीवाल हे पंजाबचे मुख्यमंत्री किंवा खलिस्तानचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतात. कुमार विश्वास यांनी आरोप केला होता की केजरीवाल यांनी मला एकदा सांगितले होते की, ते पंजाबचे मुख्यमंत्री किंवा खलिस्तानचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत.
दिग्विजय सिंह यांनी शनिवारी रात्री यासंदर्भात ट्विट केले. त्यात कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्याकडे अगदी साधी मागणी केली आहे. केजरीवाल यांनी खलिस्तानविरोधात वक्तव्य करावे. त्यावर आक्षेप नसावा. दिग्विजय सिंह यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोदीजी आणि केजरीवाल यांच्यात कमालीचे साम्य आहे. काम कमी आणि बढती जास्त. मोदी-केजरीवाल दोघेही करदात्यांचा पैसा प्रचारावर जास्त आणि कामावर कमी खर्च करतात.
विशेष म्हणजे, गुप्तचर माहितीच्या आधारे धोक्याच्या आकलनाचा आढावा घेतल्यानंतर केंद्राने शनिवारी विश्वास यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला.
In support of Kumar Vishwas, Congress leader Digvijay Singh said that Kejriwal should make a statement against Khalistan supporters
महत्त्वाच्या बातम्या
- युक्रेनमधून सात लाख लोकांचे पलायन; रशियन सैन्याचे सीमेवर शक्तिप्रदर्शन; अण्वस्त्राचा धाक
- हेमामालिनीच्या गालावर सगळ्या पक्षांचे नेते बोलतात आणि नंतर एकमेकांवर गुरकावतात…!!
- CBSE Term 1 Result 2021 Updates : सीबीएसई टर्म 1 चा निकाल आज जाहीर होणार ? असा तपासा तुमचा स्कोअर…
- सोमय्यांनी डिवचले; राऊत (चु*) घसरले; चंद्रकांतदादा संतापले…!!; सोमय्यांनी पुन्हा टोलवले…!!